Coronavirus Vaccine: लस निर्मितीनंतर भारतात कोरोना व्हायरस लगेच  संपेल? तेवढी वितरण प्रणाली सक्षम आहे काय?
Coronavirus Vaccine | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

भारतासह जगभरातील देश कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. अनेक देशांनी कोरोना व्हायरस नियंत्रणात ठेवणारी लस निर्मिती केल्याचा दावा केला आहे. तर काही ठिकाणी चाचण्या अंतिम टप्प्यात आहे. अशा स्थितीत भारतातही कोरोना व्हायरस लस (COVID-19 Vaccine) निर्मिती झाली अथवा इतर कोणत्या देशाकडून भारताने कोविड 19 लस मागवली तरीही भारतातील कोरोना व्हायरस संसर्ग अथवा संकट लगेचच संपुष्टता येईल काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. आशावादी लोक याचे उत्तर होय असे देतील. तर वास्तववादी लोक याचे उत्तर नाही असे देतील. कोरोना व्हायरस लस आणि भारत काय आहे वस्तुस्थिती?

भारताची लोकसंख्या साधारण 1.3 कोटी इतकी आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात कोरोना व्हायरस संसर्गाची व्याप्ती पाहता आव्हान कायम असल्याचे दिसते. कारण भारतातील काही कोटी नागरिकांचा अपवा वगळता भारताची सर्वाधिक लोकसंख्या ही गावा-खेड्यांमध्ये राहते. अशा वेळी शेवटच्या रुग्णापर्यंत कोरोना व्हायरस लस पोहोचवणे हे एक आव्हान आहे. त्यासाठी भारतातील दूर्गम आणि अतिदूर्गम भागात कोरोना व्हायरस लस पोहोचवणारी साखळी उभी करावी लागेल. प्रामुख्याने ईशान्य भारतातील दूर्गम भागात आणि डोंगराळ भागात.

देशासमोर कोरोना व्हायरस लस नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचेच नव्हे तर, लस साठवणूकीचेही मोठे आव्हान असणार आहे. त्यासोबत लस पूरवठा, लस वहन करताना त्याच्यावर पाळत ठेवण्याचेही आव्हान आहे. जेणेकरुन लसीची साठेबाजी होणार नाही. त्यासाठी डिजिटल ट्रॅकींग (Digital Tracking) महत्त्वाचे आहे. म्हणूनच इलेक्ट्रॉनिक वेक्सीन इंटेलिजेंस नेटवर्क (eVIN) सिस्टम कार्यरत करणे आवश्यक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने त्याबाबतची माहिती संसदेत रविवारी दिली. (हेही वाचा, Coronavirus Effect on Education Sector: भारताच्या शिक्षण क्षेत्रावर कोरोना विषाणूच्या गंभीर परिणाम; देशातील 1000 हून अधिक शाळा विक्रीसाठी तयार)

दरम्यान, कोरोना लस वितरण करण्यासाठी केंद्र सरकारने काही धोरण आखले आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना केंद्री आरोग्य राज्यमंत्री अश्विनकुमार चौबे यांनी संसदेत सांगितले की, केंद्र सरकारने याबाबत निश्चित धोरण आखले आहे. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक वेक्सीन इंटेलिजेंस नेटवर्क (eVIN) अंतर्गत यूनिवर्सल इम्यूनेशन प्रोग्राम (Universal Immunisation Program (UIP)) काम करेन असेही चौबे यांनी सांगितले. इव्हीआयएन ( eVIN ) ही एक इंटरनेट-आधारित डिजिटल प्रणाली आहे जी नियमित लसीकरण, लसीचा साठा, देशभरातील सुमारे 25,000 लस साठवणूक केंद्रांवर लक्ष ठेऊन असते.

दरम्यान, राज्यमंत्री चौबे यांच्या आधारी केंद्री आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, सन 2021 च्या सुरुवातीला लस उपलब्ध होईल अशी आपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांची एक समिती कार्यरत करण्यात आली आहे. ही समिती देशातील सर्व नागरिकांना तळागाळापर्यंत लस पोहोचविण्यासाठी मार्गदर्शन करेन, असेही डॉ. हर्षवर्धन यांनी या वेळी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले होते की, मी राष्ट्राला अश्वस्त करु इच्छितो की, लस निर्मितीची सर्व तयारी करण्यात आली आहे. सर्व चाचण्या पूर्णपणे यशस्वी झाल्या की लगेचच लसनिर्मीती करुन ती वितरीत केली जाईल. कमीत कमी वेळेत जास्तीतर जास्त लोकांपर्यंत लस पोहोचविण्यासाठीही एक रोडमॅप तयार करण्यात आल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले होते.

लस आली की कोरोना जाईल?

डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, सर्वांपर्यंत ही लस पोहोचविण्यात येई. मात्र, त्यासाठी काही टप्पे करण्यात येतील. सुरुवातीला 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना ही लस देण्यात येईल. त्यानंतर हळूहळू इतर वयोगटाच्या नागरिकांना आणि व्यक्तिंना ही लस देण्यात येईल.

तज्ञांच्या मते, यावर्षाच्या (2020) शेवटाला भारत मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यास सक्षम होऊ शकेल. तोपर्यंत उद्योजक, नेत्यांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आदर्श पूनावाला यांनी असा दावा केला आहे की साधारण 2024 पर्यंत जगभरातील सर्व नागरिकांना लस देता येऊ शकेल.

दरम्यान, कोरोना व्हायरस लसीकरणाबाबत अनेक दावे प्रतिदावे केले जात असलेल तरी ती एक प्रक्रिया आहे. कोरोना व्हायरस संसर्गाचा एकूण आवाका पाहता हे लसिकरण कमी कालावधीत पार पडणे अशक्य आहे. त्यासाठी बराच काळ काम करावे लागेल हे नक्की.