Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 30, 2024
ताज्या बातम्या
35 minutes ago

Viral Video: रिक्षाचालकाने विदेशी पर्यटकासोबत केले गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल

Videos Shreya Varke | Dec 21, 2024 05:05 PM IST
A+
A-

Viral Video: भारतात दररोज अनेक पर्यटक येतात. दिल्ली, राजस्थान, आग्रा, मुंबई येथील अनेक जुने किल्ले किंवा ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी परदेशातूनही पर्यटक येतात. मात्र या परदेशी पर्यटकांसोबत अनेक वेळा फसवणूक किंवा गैरवर्तनाच्या घटना घडतात. त्यामुळे देशाचे नाव खराब होते. अशीच एक घटना दिल्लीत घडली आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ दिल्लीचा आहे. अनेक वेळा टॅक्सीचालक किंवा रिक्षाचालक परदेशातून येणाऱ्या पर्यटकांकडून जास्त पैसे घेतात. अशाच एका रिक्षाचालकाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक विदेशी पर्यटक एका तरुणाला 500 रुपये देत असल्याचे दिसत आहे. मात्र हा तरुण विदेशी पर्यटकाकडे 1500 रुपयांची मागणी करतो. दोघांमध्ये खूप वाद होतात. यादरम्यान हा पर्यटक व्हिडिओ बनवतो. हे देखील वाचा: Viral Video: कोलांटी उडी मारतांना तरुणाच्या मानेला गंभीर दुखापत, 6 दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू

जाणून घ्या, संपूर्ण घटना 

View this post on Instagram

A post shared by Victor Blaho (@samesamevic)

 दिल्लीच्या चांदनी चौकातील असल्याची माहिती आहे. पर्यटक रिक्षाचालकाला 500 रुपये देतो, मात्र तो पर्यटकाकडून 1500 रुपयांची मागणी करतो, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे. शेवटी हे भाडे नसून पर्यटकाने आनंदाने रिक्षाचालकाला दिलेले पैसे असल्याचे उघड झाले आहे.

लोक मदतीला आले, पर्यटकाने लोकांचे आभार मानले

ही घटना घडली त्यावेळी अनेक लोक जमा झाले आणि रिक्षावाल्याला शिवीगाळ करून 300 रुपये परत करण्यास सांगतात. यानंतर रिक्षाचालक तेथून निघून जातो. लोकांचे आभार मानून पर्यटक निघून जातो. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @samesamevic नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.

RELATED VIDEOS