Arun Jaitley Stadium, Delhi (Photo Credit - X)

Delhi Capitals vs Gujarat Titans, 60th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 60 वा सामना आज म्हणजेच 18 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (DC vs GT) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामात आतापर्यंत दोन्ही संघांनी मैदानावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शुभमन गिल या हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. गुजरात टायटन्स संघ सध्या 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स संघ 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांना आजचा सामना म्हत्वाचा आहे.

हेड टू हेड रेकाॅर्ड (DC vs GT Head to Head)

आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एकूण सहा सामने खेळले गेले आहेत. या काळात, आतापर्यंत दोन्ही संघांमधील लढत जवळजवळ समान राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने तीन सामने जिंकले आहेत. तर, गुजरात टायटन्सनेही तीन सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघांमधील ही दुसरी भेट आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने सात विकेट्सने विजय मिळवला होता. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले होते. या काळात दिल्ली कॅपिटल्सने दोन्ही सामने जिंकले होते. दिल्ली कॅपिटल्सने पहिला सामना 4 धावांनी जिंकला, तर दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला.

हे देखील वाचा: Delhi Capitals vs Gujarat Titans IPL Stats: आयपीएलच्या इतिहासात दिल्ली आणि गुजरातची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, आकडेवारीवर एक नजर

पिच रिपोर्ट (DC vs GT Pitch Report)

अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम हे फलंदाजांसाठी स्वर्ग मानले जाते. या मैदानावर जलद आउटफिल्ड आणि लहान सीमारेषा असल्यामुळे फलंदाजांना जलद धावा काढण्यास मदत मिळते. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांसाठी फारसे काही नाही. अशा परिस्थितीत गोलंदाज विकेट घेण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करतात. या मैदानावरील खेळपट्टीवरून फिरकी गोलंदाजांना मदत मिळते आणि त्यांचा रेकॉर्डही चांगला आहे. या स्टेडियमची खेळपट्टी काळ्या मातीपासून बनलेली आहे, जी खूप कठीण आणि सपाट आहे. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देईल.

दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर

दिल्ली कॅपिटल्स: फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल (विकेटकीपर), केएल राहुल, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, माधव तिवारी, मुस्तफिजुर रहमान, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव आणि टी नटराजन.

गुजरात टायटन्स: साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), राहुल तेवतिया, शाहरुख खान, रशीद खान, साई किशोर, अर्शद खान, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.