Delhi Capitals vs Gujarat Titans IPL Stats: आयपीएलच्या इतिहासात दिल्ली आणि गुजरातची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, आकडेवारीवर एक नजर

शुभमन गिल या हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. गुजरात टायटन्स संघ सध्या 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स संघ 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांना आजचा सामना म्हत्वाचा आहे.

Delhi Capitals vs Gujarat Titans IPL Stats: आयपीएलच्या इतिहासात दिल्ली आणि गुजरातची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी, आकडेवारीवर एक नजर
Photo Credit- X

Delhi Capitals vs Gujarat Titans, 60th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 60 वा सामना आज म्हणजेच 18 मे रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स (DC vs GT) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. या हंगामात आतापर्यंत दोन्ही संघांनी मैदानावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शुभमन गिल या हंगामात गुजरात टायटन्सचे नेतृत्व करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. गुजरात टायटन्स संघ सध्या 16 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर, दिल्ली कॅपिटल्स संघ 13 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांना आजचा सामना म्हत्वाचा आहे. (हे देखील वाचा: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड)

हेड टू हेड रेकाॅर्ड (DC vs GT Head to Head)

आयपीएलच्या इतिहासात गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात एकूण सहा सामने खेळले गेले आहेत. या काळात, आतापर्यंत दोन्ही संघांमधील लढत जवळजवळ समान राहिली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने तीन सामने जिंकले आहेत. तर, गुजरात टायटन्सनेही तीन सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघांमधील ही दुसरी भेट आहे. पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने सात विकेट्सने विजय मिळवला होता. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले होते. या काळात दिल्ली कॅपिटल्सने दोन्ही सामने जिंकले होते. दिल्ली कॅपिटल्सने पहिला सामना 4 धावांनी जिंकला, तर दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला.

गुजरातच्या 'या' खेळाडूंनी दिल्लीविरुद्ध केली आहे चांगली कामगिरी

गुजरात टायटन्सचा सध्याचा कर्णधार शुभमन गिलने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 14 सामने खेळले आहेत. या काळात शुभमन गिलने 27.57 च्या सरासरीने आणि 127.81 च्या स्ट्राईक रेटने 386 धावा केल्या आहेत. शुभमन गिलचा सर्वोत्तम स्कोअर 84 धावा आहे. शुभमन गिल व्यतिरिक्त, स्फोटक फलंदाज जोस बटलरने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 13 डावात 34.42 च्या सरासरीने 413 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत, रशीद खानने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 17 सामन्यात 19.52 च्या सरासरीने 21 विकेट्स घेतल्या आहेत.

दिल्लीच्या 'या' खेळाडूंनी गुजरातविरुद्ध केली आहे चांगली कामगिरी

दिल्ली कॅपिटल्सच्या सध्याच्या संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलने गुजरात टायटन्सविरुद्ध 4 सामन्यांमध्ये 27.25 च्या सरासरीने आणि 100.00 च्या स्ट्राईक रेटने 109 धावा केल्या आहेत. या काळात केएल राहुलने अर्धशतक झळकावले आहे. केएल राहुल व्यतिरिक्त, फाफ डू प्लेसिसने गुजरात टायटन्सविरुद्ध 5 डावात 32.00 च्या सरासरीने आणि 166.67 च्या स्ट्राईक रेटने 160 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने गुजरात टायटन्सविरुद्ध 7.07 च्या इकॉनॉमीने 2 विकेट्स घेतल्या आहेत.

अरुण जेटली स्टेडियममध्ये दोन्ही संघांची कामगिरी

आयपीएलच्या इतिहासात, दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या होम ग्राउंड अरुण जेटली स्टेडियमवर 86 सामने खेळले आहेत. या काळात दिल्ली कॅपिटल्स संघाने 36 सामने जिंकले आहेत आणि 47 सामने गमावले आहेत. दरम्यान, एक सामना अनिर्णीत राहिला आणि दोन सामने बरोबरीत सुटले. या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचा सर्वोत्तम धावसंख्या 257 धावा आहे. दुसरीकडे, गुजरात टायटन्सने या मैदानावर दोन सामने खेळले आहेत. यामध्ये गुजरात टायटन्स संघाने एक जिंकला आहे आणि एकामध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 18, 2025 04:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).