Kidnapping Video: अपहरण झालेल्या तरुणीचा आरोपीसोबत विवाह;  पीडितेला पळवले नाही, ती स्वत:च पळाली, 'कहाणी में ट्विस्ट' (व्हिडिओ)

तेलंगणातील एका गावातून 18 वर्षीय महिलेचे अपहण (Telangana Kidnapping CCTV Footage Case) झाल्याचा एक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडयावर (Social Media) व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) आहे. या घटनेची प्रसारमाध्यमांतून आणि सोशल मीडियातून जोरदार चर्चा सुरु असतानाच प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. संबंधित महिलेचे अपहरण नव्हे तर आरोपी आणि पीडिता यांच्या संगणमतानेच हा प्रकार घडल्याचे पुढे येत आहे. अपहरण झालेली पीडिता चक्क आरोपीसोबत विवाहबद्ध झाली आहे. इतकेच नव्हे तर आता तिला तिच्या स्वत:च्या आणि आरोपी म्हणजेच तिच्या पतीच्या जीविताचीही काळजी वाटते आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओत पाहायला मिळते की, वधूच्या पेहरावाशी साधर्म्य असलेल्या पोशाखात दिसणाऱ्या एका महिलेचे चार लोक अपहरण करत आहे. एका कारमध्ये बसवून ते तिला पळवून घेऊन जात आहेत. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या चौघांपैकीच एकासोबत तिने विवाह केला आहे. त्यामुळे प्रकणाने भलतेच वळण घेतले आहे. (हेही वाचा, Kidnapping Video: ‘ते’ आलेत आणि थेट घरातून उचलून घेवून गेले, पहा 18 वर्षिय मुलीच्या अपहरणाचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ)

पीडितेने आरोपीसोबत विवाह केल्याचे जाहीर केले आहे. इतकेच नव्हे तर तिने या आधीही त्याच्यासोबत पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पीडितेच्या वडिलांचा आंतरजातीय विवाहाला विरोध होता. त्यामुळे या दोघांच्या विवाहासाठी घरुनच अडथळा होता. घरातल्यांना कानोकान खबर न लागू देता दोघांनी 10 महिन्यांपूर्वी विाह केला होता. मात्र, घरच्यांना या विवाहाबाबत कळल्यावर तिच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरुन तिच्या प्रियकराविरुदध (24 वर्षी तरुण आरोपी) लैंगिक आत्याचार आणि बालविवाह कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला होता. कारण पीडितेचे वय कमी होते. आता वयाची अडचण दूर झाली आहे. त्यामुळे आरोपीने तिला पळवून नेले.

ट्विट

दरम्यान, एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तात, अपहरणाची घटना घडली नसल्याचेही पीडितेने म्हटले आहे. तिला कारमध्ये ढकलण्यात आले तेव्हा तिचे तोंड झाकले गेल्याने आपल्याला अपहरण होते आहे असे वाटल्याचे तिने म्हटले आहे. पण जेव्हा तिने पाहिले की, तिच्यासोबत कारमध्ये बसलेला व्यक्ती तिचा प्रियकरच आहे. ज्याच्यावर ती पाठिमागील 4 वर्षांपासून प्रेम करते तेव्हा तिला बरे वाटले. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.