एका बाजूला असलेले कोरोनाचे संकट आणि दुसऱ्या बाजूला कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्यांना जोरदार फटका बसत आहे. तर कच्च्या तेलाच्या किंमती दिवसागणिक नवा दर गाठत आहेत. न्यूज एजेंसी रॉयटर्स यांच्या मते, ब्रेंट क्रुडचे दर 78 डॉलर प्रति बॅरल झाले आहेत. तरर भारतात 80 टक्के कच्चे तेल हे विदेशातून खरेदी केले जाते. यासाठीच विदेशी बाजारात महागड्या कच्च्या तेलामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वेगाने वाढ होत आहे.
दिल्लीतील पेट्रोल 101.19 पैसे प्रति लीटर आणि डिझेल 88.62 प्रति लीटरने विक्री केले जात आहे. तसेच मुंबईत पेट्रोल 107.26 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 96.16 पैसे प्रति लीटर आहे. अद्याप ही पेट्रोल-डिझेलच्या दरांनी रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. बहुतांश शहरात पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लीटरहून अधिक आहेत. तसेच काही शहरात डिझेल सुद्धा शंभरीच्या पार गेले आहे.(Sensex ने पार केला पहिल्यांदाच 60 हजारांचा टप्पा)
पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी गुरुवारी न्यूज एजेंसी पीटीआय यांना असे म्हटले की, राज्य सरकार पेट्रोल-डिझेलच्या दरावर अधिक टॅक्स वसूल करत आहेत. यामुळे इंधनाच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे. जो पर्यंत राज्य सरकार पेट्रोलला जीएसटीच्या अंतर्गत आणण्यास सहमत होत नाही तो पर्यंत ते स्वस्त होण्याची शक्यता नाही.
हरदीप सिंह पुरी यांनी असे म्हटले की, टॅक्सच्या आधारावर वसूल करण्यात येणारी रक्कम ही केंद्र सरकार कडून मोफत राशन, घर आणि उज्ज्वला योजनेसाठी मोफर घरगुती गॅस कनेक्शन देत आहे. या व्यतिरिक्त काही योजना या शेतकरी आणि सामान्यांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने टॅक्स मध्ये वाढ करत जुलै मध्ये पैट्रोल 3.51 टक्के प्रति लीटर पर्यंत महाग केले होते. तसेच राज्यात पेट्रोलचे दर शंभरीच्या पार गेले आहेत. इंधनाच्या किंमतीत वाढ झाली असली तरीही देशात पेट्रोल-डिझेलची मागणी वाढत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी ऑगस्ट महिन्यात 24.3 लाख टन पेट्रोलची विक्री केली होती.