सर्वसामान्य जनता, असंघटीत कामगार, महिला आणि मध्यमवर्गीय नागरिकांनाही या अर्थसंकल्पाचा फायदा होईल: नरेंद्र मोदी

#Budget2019: केंद्र सरकारने मध्यमवर्गाला अर्थसंकल्पात मोठी भेट दिली. नागरिकांचे 5 लाख रुपयांचे उत्पन्न टॅक्स फ्री करण्याचा निर्णय सरकारने घेतला. दीड लाख रुपयांची बचतही पूर्णपणे टॅक्स फ्री राहणार आहे. या पद्धतीने बचक केल्यास मध्यमवर्गाला 6.5 लाख रपयांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री राहणार आहे. सरकारच्या या घोषणेचा फायदा सुमारे 3 कोटी मध्यमववर्गीय करदात्यांसाठी मिळणार आहे. या करदात्यांना करसवलत मिळणार आहे.

वेतनउभोक्त्याचे स्टॅंडर्ड टॅक्स डिडक्शनम 40,000 रुपयांऐवजी वाढवत 50000 रुपये इतके करण्यात आले आहे. बँक आणि पोस्ट ऑफिस डिपॉझिट च्या 10000पेङा अधिक व्याज टीडीएसवर लागत होते. ही रक्कम वाढवून  40000 रुपये करण्यात आली आहे.

दरम्यान, 'एक पांव रखता हूं, हजार राहें फूट पड़ती हैं' अशा कवितेच्या ओळी उच्चारत कॅबिनेट मंत्री पियुष गोलय यांनी आपले अर्थसंकल्पीय भाषण  संपवले.

2018/19 च्या तुलनेत 2020/21मध्ये खर्चात 13 टक्क्यांची वाढ होईल. यात व्यक्तिगत खर्च 336293 रुपये होईल, एससी आणि एसटी वर्गाच्या कल्याणासाठी 2018/19 मध्ये 56,619 कोटी रुपयांचे उद्दीष्ट होते. 2018/19मध्ये 62474 रुपयांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना देण्यात आलेला इनकम सपोर्ट डोळ्यासमोर ठेऊन जीडीपीनुसार वित्तीय तूट आगामी वर्षासाटी 3.4 टक्के होईल.

नेक्स्ट जनरेशन का इन्फ्रास्ट्रक्चर: ही योजना भौतिक आणि सामाजिक अशा दोन्ही पद्धतीची असेल.

डिजिटल भारत निर्माण: भारताच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांचे जीवनमान उंचविण्यासाठी

क्लीन आणि ग्रीन इंडिया: ग्रिन एनर्जीचा वापर वाढविण्यासाठी 

ग्रामीण उद्योग विकास: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन गावांचा विकास करण्यासाटी 

स्वच्छ नद्या: भारतातील नद्या साफ करण्यासाठी आणि ब्लू इकनॉमिचा विकास करण्यासाठी 

समुद्र आणि समुद्र तट योजना: समुद्री विकास आणि व्यापार वाढविण्यासाठी

गगनयान: 2022 पर्यंत भारताचे आंतराळात पोहोचण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी

अन्नधान्य स्वयंपूर्णता:

स्वस्थ भारत: आयुष्यमान भारत योजना

मिनिमम गवर्नमेंट, मॅक्सिमम गवर्नन्स 

#Budget2019: जानेवारी 2019 मध्ये जीएसटी कलेक्शनचा आकडा सुमारे 1 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढला. पाच कोटीपेक्षा कमी उत्पन्न असलेले व्यापारी, ज्यांचा जीएसटी (GST) भरण्यात जवाळपास 90 टक्के सहभाग आहे, त्यांना तिमाही रिटर्न देण्यासाठी मान्यता देण्यात येईल: पियुष गोयल

मध्यमवर्गांला धक्का: इनकम टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही. तसेच, कॉर्पोरेट टॅक्स स्लॅबमध्येही कोणतेही बदल नाहीत: पियुष गोयल

#Budget2019: देशात करभरना वाढला आहे. आयकर विभाग आता ऑनलाईन पद्धतीने काम करतो. त्यामुळे कामाचा उराकाही वाढला असून, देशातील करभरणा वाढला, आयकर विभागाने सुमारे 99.54 टक्के आयटीआर फाईल्सना मान्यता दिली: पियुष गोयल

#Budget2019: चित्रपट उद्योग मोठ्या प्रमाणावर उद्योग निर्माण करतो. भारतीय चित्रपट निर्मात्यांना चित्रिकरणासाठी सिंगल क्लीयरन्स मिळणार: पियुष गोयल 

दरम्यान, नुकताच प्रदर्शित झालेला उरी चित्रपट पाहून आपल्यालाही स्पूर्थी आल्याचे पियुष गोयल यांनी सभागृहात सांगितले.

#Budget2019: #Budget2019: देशात प्रतिदिन 27 किलोमिटर या वेगाने महामार्ग बांधले जात आहेत. जगाच्या तुलनेत महामार्ग बनविण्याचा वेग भारतात अधिक गतिमान. अनेक दशकं रखडलेले प्रकल्प मार्गी लागत आहेत: पियुष गोयल

#Budget2019: रेल्वे प्रवाशांना दिलासा: रेल्वे गाड्यांचा वेग, सेवा आणि सुरक्षा वाढणार. त्यासाठी मेक इन इंडियाला प्राधान्य दिले जाईल : पियुष गोयल

#Budget2019 : गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहिली तर, मोबाईल डेटा वापरात तब्बल 50 पटींची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मोबाईल डेटा दर हे जगाच्या तुलनेत भारतात अत्यालप आहेत - पियुष गोयल

Load More

Budget 2019: मोदी सरकारच्या कारर्दीतील आणि लोकसभा निवडणूकी पूर्वीचे यंदाचे हे शेवटचे बजेट असून आज अर्थमंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) अंतरिम बजेट (Interim Budget) सादर करतील. 31 जानेवारीपासून संसदेचं अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झालं आहे. निवडणूकीपूर्वीचे हे शेवटचे बजेट असल्याने संपूर्ण देशाच्या नजरा आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत.

अंतरिम अर्थसंकल्पात नेमका कोणाला किती फायदा होणार, कर सूट किती मिळणार याबद्दल देशवासियांना उत्सुकता आहे. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये पुढील आर्थिक वर्षाच्या चार महिन्यांसाठी खर्चाची संसदेत अनुमती घेतली जाईल. तर सर्वसाधारण अर्थसंकल्प (General Budget) नव्याने सत्तेत येणारे सरकार जुलैमध्ये सादर करेल. (सर्वसामान्यांना मोदी सरकार लवकरच देणार गूड न्युज! करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 5 लाख होणार?)

काँग्रेसचा देशातील वाढता बोलबाला पाहता यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी खास सवलती देण्यात येतील, अशी आशा आहे. शेतकऱ्यांसाठी 70 हजार कोटी ते एक लाख कोटी रुपयांपर्यंतची रक्कम राखीव ठेवण्यात येईल. तसंच हा अर्थसंकल्प महिलांसाठीही खास असण्याची अपेक्षा आहे. महिलांसाठी नव्या योजना आणि सुविधांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात येईल.

सेन्सेक्स, निफ्टी वधारला

अर्थसंकल्पापूर्वी बॅंकीक, वाहन, फार्मा, आयटी आणि एफएमसीजी शेअरमध्ये वाढ झाल्याने गुरुवारी मुंबई शेअर सेन्सेक्समध्ये 665.44 अंकांची वाढ झाली. तर निफ्टीमध्ये सुमारे 179.15 अंकांची वाढ झाली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी देखील 10,800 या अंकावर पोहचला आहे.