1 ऑक्टोंबर पासून ऑटो डेबिटच्या नियमात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार तुमच्या परवानगी शिवाय तुमच्या खात्यातून पैसे ऑटो डेबिट केले जाणार नाही आहेत. खरंतर आरबीआयने ग्राहकांना ऑटो डेबिट संदर्भात माहिती देण्यास सुरुवात केली आहे. नवा नियम लागू झाल्यानंतर कोणत्याही डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मवर हप्ता किंवा बिलाचे पैसे भरण्यासंदर्भातील प्रत्येत ट्रांजेक्शनसाठी ग्राहकाची परवानगी घेतली जाणार आहे. तर कोरोना व्हायरसच्या कारणामुळे आरबीआयने ऑटो डेबिटच्या नियमाची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवली होती. तर ऑटो डेबिटची मुदत 1 एप्रिल पासून सुरु करण्याबद्दल सांगण्यात आले होते.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नव्या नियमाअंतर्गत मोबाइल फोनचे बिल, लाइट बिल, पाण्याचे बिल किंवा कोणत्याही प्रकारचे पेमेंट करता येऊ शकते. तर 5 हजार रुपयांच्या खालील बिल रद्द होतील किंवा ऑटो डेबिटच्या परवानगी नंतर खात्यातून पैसे कापले जातील. जर बिल 5 हजार रुपयांहून अधिक असेल आणि 30 सप्टेंबर नंतर नियमाचे पालन करता ऑनलाइन ट्रान्सफर करावे लागणार आहे. तसेच इंश्युरन्स प्रीमियम सुद्धा 5 हजारांपेक्षा अधिक असेल तर ऑटो डेबिट होणार नाही. अशा स्थितीत क्रेडिट कार्डच्या माध्यमातून CVV आणि OTP च्या माध्यमातून ट्रांजेक्शन पूर्ण करता येईल.(LPG सिंलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ, महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा झटका)
दरम्यान, बँकांनी आपल्या ग्राहकांना नव्या नियमाची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. बँकांनी ग्राहकांना ऑटो डेबिटच्या नियमाबद्दल सुचित केले आहे. त्यांनी असे म्हटले की, नव्या नियमानुसार कार्डवर दिल्या जाणाऱ्या सध्याच्या गाइडलाइन्सचे पालन केले जाणार नाही आहे. सर्विसमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून थेट मर्चेंटला कार्डच्या माध्यमातून पैसे देता येणार आहेत. तसेच नव्या नियमानुसार, बँक खात्यातून पेमेंट होण्याच्या 5 दिवस आधी ग्राहकांना नोटिफिकेशन पाठवले जाणार आहेत. ग्राहकांच्या परवानगीनंतरच ट्रांजेक्शन पूर्ण होणार आहे. या व्यतिरिक्त 5 हजारांहून अधिक ट्रांजेक्शनसाठी बँकांनी ग्राहकांना ओटीपी पाठवावा.