LPG सिंलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ, महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा झटका

LPG Price Hike: ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सामान्यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे. कारण दिवसागणिक वाढत चालेल्या इंधनदर वाढीसह आता पेट्रोलियम कंपन्यांनी सुद्धा त्यांची एलपीजी सिंलिंडरच्या दरात वाढ केली आहे. कमर्शियल सिलिंडरचे दर 43.5 रुपयांनी वाढले गेले आहेत. यामध्ये रेस्टॉरंट, ढाबा आणि अन्य ठिकाणचे फूड्स खाण्यासाठी थोडे अधिक पैसे द्यावे लागू शकतात.(New Excise Policy: दिल्लीत पुढील दीड महिना दारुची दुकाने बंद, जाणून घ्या कारण)

इंडियन ऑइल यांच्या वेबसाइटनुसार, आता दिल्लीत 10 किलो कमर्शियल सिलिंडर 1736.5 रुपये झाला आहे. याचे दर आधी 1693 रुपये होते. तर घरगुती वापरासाठीचा 14.2 किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल न करत थोडासा दिलासा दिला आहे.

कोलकाता मध्ये 19 किलो कमर्शियल सिलिंडरची किंमत 1805.5 रुपये झाली आहे. यापूर्वी त्यासाठी 1770.5 रुपये मोजावे लागत होते. दरम्यान, पेट्रोलियम कंपन्या प्रत्येक 15 दिवसांनी एलपीजीच्या किंमतीबद्दल आढावा घेत असतात.(SBI Card ची 'दमदार दस' फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर; 3 ऑक्टोबरपासून घेता येईल लाभ)

यापूर्वी 1 सप्टेंबरला घरगुती गॅसच्या किंमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. या वाढलेल्या किंमतीनंतर दिल्लीत 14.2 किलोचा एलपीजी सिलिंडर दर 884.50 रुपये झाला होता. परंतु या महिन्यात सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यामुळे सामान्यांना थोडासा दिलासा मिळू शकतो.

दरम्यान, सरकारने गुरुवारी संध्याकाळी नैसर्गिक गॅसच्या किंमतीत 62 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. नैसर्गिक गॅसचा वापर फर्टिलाइजर, वीजेपासून उत्पादन आणि सीएनजी गॅस तयार करण्यासाठी करतात. या निर्णयानंतर सीएनजी, पीएनजी आणि फर्टिलायजरच्या किंमतीत वाढण्याची शक्यता आहे.