SBI Card ची 'दमदार दस' फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर; 3 ऑक्टोबरपासून घेता येईल लाभ
SBI | (Photo Credits: PTI)

आगामी काळात दसरा-दिवाळी हे मोठे सण येणार आहेत. या सणासुदीच्या काळात एसबीआय (SBI) ने ग्राहकांसाठी 'दमदार दस' फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर (Festive Cashback Offer) सादर केली आहे. 3 ऑक्टोबर 2021 पासून ग्राहकांना या ऑफरचा लाभ घेता येईल. मात्र ही ऑफर केवळ 3 दिवसांसाठी असणार आहे. या तीन दिवसांच्या फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर अंतर्गत ग्राहकांना कोणत्याही घरगुती ई-कॉमर्स वेबसाईटवरुन ऑनलाईन शॉपिंगची संधी मिळणार आहे. तसंच खरेदीवर 10 टक्क्यांचा कॅशबॅक देखील मिळेल. ईएमआय (EMI) पर्यायांवर देखील ही ऑफर उपलब्ध असेल.

मोबाईल फोन आणि अॅक्सेसरीज, टीव्ही आणि मोठी उपकरणं, लॅपटॉप आणि टॅब्लेट, होम फर्निशिंग, किचन उपकरणं, फॅशन आणि लाइफस्टाइल, स्पोर्ट आणि फिटनेस यासारख्या उत्पादनांच्या खरेदीवर ही कॅशबॅक ऑफर उपलब्ध असेल. मात्र विमा, प्रवास, पाकीट, दागिने, शिक्षण आणि युटिलिटी मर्चंटस् यासारख्या ऑनलाईन खर्चांवर या ऑफरचा लाभ घेता येणार नाही. (SBI चा ग्राहकांना खोट्या Customer Care क्रमांकापासून सावध राहण्याचा इशारा)

SBI Card Tweet:

कार्डधारकांचा ऑनलाईन खरेदीवर भर असल्याचे डेटा अॅनालिसिसमध्ये आढळून आले. विशेषत: सणासुदीच्या काळात हा ट्रेंड अधिक असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या ऑफरअंतर्गत कार्डधारक कोणत्याही वेळी सुरक्षित आणि सोयीस्कर पद्धतीनं पेमेंट करू शकतील, असे एसबीआय कार्डचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राममोहन राव अमारा यांनी सांगितले. त्याचबरोबर आम्ही कार्डधारकांना सोयीस्कर, सुलभ आणि सुरक्षित पेमेंट सोल्यूशन्स (Payment Solution) प्रदान करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, हा संदेश देखील या ऑफरद्वारे ग्राहकांनापर्यंत पोहचेल, असेही ते म्हणाले.