State Bank of India (SBI) | (Photo Credits: PTI/File)

कोरोनाच्या काळात डिजिटल पद्धतीने व्यवहार केले जात आहेत. अशातच फसवणूकदार सुद्धा नागरिकांची लूट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ग्राहकांना फसवणूकीपासून दूर राहता यावे यासाठी देशातील सर्वाधिक मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने खोट्या कस्टमर केअर क्रमांकासंदर्भात अलर्ट जाहीर केला आहे. एसबीआयने ट्विट करत असे म्हटले की, खोट्या कस्टमर केअर क्रमांकापासून दूर रहावे. योग्य कस्मटर केअर क्रमांकासाठी एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्याचसोबत आपली गुप्त माहिती कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करणे टाळा.

बँकेने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओ असे म्हटले की, कोणत्याही प्रकारची फसवणूक झाल्यास त्याबद्दल तक्रार करा. तुम्हाला तक्रार करायची असल्यास report.phising@sbi.co.in  किंवा सायबर क्राइम हेल्पलाइन क्रमांक 155260 वर फोन करा.(PAN-Aadhaar Link करण्याच्या मुदतीत 6 महिन्यांनी वाढ; पहा काय आहे अंतिम तारीख)

Tweet:

खोट्या कस्टमर केअर क्रमांकावर फोन केल्यास तुमच्या खात्यातील पैसे चोरीला जाऊ शकतात. ऐवढेच नव्हे तर फसवणूकदारांना तुमच्या खात्यासंबंधित गुप्त माहिती सुद्धा त्यांना मिळते. या व्यतिरिक्त कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत बँक खात्यासंबंधित माहिती शेअर करण्यापासून दूर रहा. तसेच बँकेसंबंधित कोणतेही काम असेल तर प्रथम बँकेच्या शाखेला किंवा अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.