आधार-पॅन लिकिंगची (PAN-Aadhaar Linking) मुदत 6 महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कोविड-19 संकटामुळे (Covid-19 Pandemic) नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आल्याचे Central Board of Direct Taxes (CBDT) ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. पॅनला आधारशी जोडण्यासाठी आयकर विभागाला ( Income tax Department) आधार क्रमांक कळवण्याची वेळ मर्यादा 30 सप्टेंबर, 2021 ते 31 मार्च, 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिक 31 मार्च 2022 पर्यंत आधार-पॅन लिंक करु शकतात.
तसंच आय-टी कायद्यांतर्गत दंडाची कार्यवाही पूर्ण करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. याशिवाय बेनामी मालमत्ता व्यवहार प्रतिबंधक अधिनियम, 1988 अंतर्गत न्यायनिर्णय प्राधिकरणाकडून नोटीस जारी करण्याची आणि आदेश पारित करण्याची मुदत मार्च 2022 वाढविण्यात आली आहे. (incometaxindiaefiling.gov.in साईट डाऊन मग SMSच्या माध्यमातून असे करा पॅन-आधार लिंक)
आधार-पॅन लिकिंगची मुदत वाढवून सरकारने नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान, आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही महत्त्वाची ओळखपत्रं असून अनेक कामांची ती लिंक असणे अत्यंत गरजेचे आहे. कोविड-19 संकटात नागरिकांना आधार-पॅन लिंक करण्यात येणाऱ्या अडचणी पाहता सरकारने मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, यापूर्वी अनेकदा ही मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी या मुदतीचा फायदा घेत दोन्ही कागदपत्रं एकमेकांना जोडणे आवश्यक आहे.0 (पॅन-आधार कार्डशी लिंक करणे आहे अनिवार्य; 'या' सोप्प्या स्टेप्स वापरून आजच पूर्ण करा काम)
पॅनकार्ड आधारकार्ड सोबत लिंक न केल्यास तुमचं पॅनकार्ड आयकर कायद्याच्या कलम 139 AA अंतर्गत अवैद्य होईल. अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डला जोडू शकता.