PAN-Aadhaar Linking चा आजचा शेवटचा दिवस; incometaxindiaefiling.gov.in साईट डाऊन मग SMSच्या माध्यमातून असे करा पॅन-आधार लिंक
PAN-Aadhaar (Photo Credits: PTI)

तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याचा आज (31 मार्च) हा शेवटचा दिवस आहे. जर तुम्ही हे आज करू शकला नाहीत तर उद्या म्हणजे 1 एप्रिल 2021 पासून तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय केले जाणार आहे. याचा फटका तुमच्या अनेक आर्थिक व्यवहारांना बसू शकतो. त्यामुळे आता शेवटचे काही तास उरले असताना जागे झालेले अनेक जण ऑनलाईन माध्यमातून पॅन कार्ड- आधार लिंकिंग करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण सध्या आयकर विभागाची www1.incometaxindiaefiling.gov.in/e-filingGS/Services/AadhaarPreloginStatus ओपन होत नसल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. ट्वीटर वरही अनेकांनी त्याबाबत तक्रार करत ट्वीट्सचा भडीमार केल्याने सध्या #PANcard #Aadhar ट्वीटर ट्रेंडमध्ये दिसत आहेत. पण चिंता करायची काहीच गरज नाही, जर ऑनलाईन लिंकिंगसाठी वेबसाईट सुरू होत नसेल तर तुम्ही SMS च्या माध्यमातून पॅन कार्ड - आधार कार्ड लिंक करू शकता. Aadhaar-PAN Details Mismatch: तुमच्या आधार-पॅन कार्डवर नाव आणि जन्मतारीख वेगवेगळी आहे का? पहा, कसे कराल दुरुस्त?

नेटकर्‍यांनी ट्वीटर वर व्यक्त केलेला संताप 

 

SMS च्या माध्यमातून पॅन कार्ड - आधार कार्ड लिंक कसे कराल?

SMS च्या माध्यमातून पॅन कार्ड - आधार कार्ड लिंक करण्यासाठी तुम्हांला UIDAIPAN(12digit Aadhaar number) स्पेस (10 digit PAN Number) या फॉर्मेट मध्ये एक एसएमएस 567678 किंवा 56161 या नंबरवर पाठायचा आहे.

दरम्यान आजचा दिवस आधार- पॅन कार्ड लिंकिंगचा शेवटचा आहे. जे भारतीय त्यांचे आधार-पॅन लिंक करू शकणार नाहीत त्यांना Finance Bill, 2021 अन्वये एक हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. सप्टेंबर 2018 मध्ये सुप्रीम कोर्टाने आधारला घटनात्मक वैध म्हणून घोषित केले होते आणि आयकर विवरणपत्र भरण्यासाठी आणि पॅन कार्ड वाटपासाठी बायोमेट्रिक आयडी म्हणून आधार अनिवार्य कागदपत्र राहील असे म्हटले होते.