Aadhaar-PAN Linking |(Photo Credits: File Photo)

पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड (Aadhar Card) लिंक करण्याची शेवटची मुदत 31 डिसेंबर पर्यंतची असून त्याआधी हे काम न केल्यास नागरिकांना आयकर भरता येणार नाही सोबतच त्यांचे पॅन कार्ड देखील ग्राह्य धरले जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. हा मोठा भुर्दंड भरायला लागू नये म्ह्णून आजच तुम्ही हे महत्वाचे काम पूर्ण करणे उचित ठरेल. यासाठी घालवता काही सोप्प्या स्टेप्स वापरून तुम्हाला काम हे आधार- पॅन लिंकिंग पूर्ण करता येईल. यासाठी तुम्ही ऑनलाइन तसेच SMS चा वापर करू शकता.

Aadhar Card New Rule: आय-टी रिटर्न भरताना चुकीचा आधार तपशील दिल्यास होणार 10,000 रुपयांचा दंड

वास्तविक आतापर्यंत अनेक वेळा आयकर विभागाने या लिंकिंग साठी मुदत वाढवली आहे. मात्र ही या कामासाठी देण्यात आलेली अंतिम मुदत आहे. लक्षात घ्या.. 31 डिसेंबरपर्यंत पॅनकार्ड आधारकार्ड सोबत लिंक न केल्यास तुमचं पॅनकार्ड आयकर कायद्याच्या कलम 139 AA अंतर्गत अवैद्य होईल. त्यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होऊ शकतं. त्याआधीच हे काम करण्यासाठी वापरा या सोप्प्या स्टेप्स..

असे करा पॅनकार्ड-आधारकार्ड लिंक -

-तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने पॅन-आधार लिंक करू शकता.

-यासाठी तुम्हाला आयकर विभागाच्या (www.incometaxindiaefiling.gov.in) या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

-या लिंकवर तुम्ही तुमचं पॅन-आधारकार्डची जोडणी करू शकता.

-या वेबसाइटवर तुम्हाला 'लिंक आधार' हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा.

-यामध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला 'आधार कार्ड लिंक'चा पर्याय दिसेल.

-यावर आपल्या आधार कार्डवरील क्रमांक आणि कोड भरा.

-ही माहिती भरल्यानंतर 'लिंक आधार' या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड आधार कार्डशी जोडलं जाईल.

याशिवाय तुम्ही SMS च्या साहाय्यानेदेखील पॅन-आधारची जोडणी करू शकता. यासाठी आयकर विभागाच्या 567678 किंवा 56161 नंबरवर SMS पाठवा. वरील पद्धतींचा वापर करून तुन्ही पॅन-आधार कार्डची जोडणी करू शकता आणि आपलं आर्थिक नुकसान टाळू शकता.