
सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेता महाराष्ट्र सायबर सेल (Maharashtra Cyber Cell) सेक्सटॉर्शन, फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगबद्दल जागरूकता निर्माण करत आहे. अभिनेत्री अमिषा पटेलने (Amisha Patel)इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती पोलीस गणेशात संबंधीत गुन्ह्याबाबत जागृकता वाढवताना दिसली. व्हिडीओत तीने पिडीतांची फसवणून कशी केली जाते याबद्दल म्हटले. ज्यात ती बोलते. 'प्रत्येक क्लब संगीत वाजवत नाही, परंतु काही क्लब ब्लॅकमेल (Scam)करण्यासाठी असतात.' व्हिडिओमध्ये अमिषा पटेल टिंडर आणि इतर पोर्टलद्वारे होणाऱ्या डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल बोलताना दिसत आहे. ज्यांचा वापर स्कॅमर लोकांची फसवणूक करण्यासाठी करतात. Gay Dating App: पुण्यात समलैंगिक डेटिंग अॅपवरून 50 हून अधिक तरुणांची फसवणूक; पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश, 4 जणांना अटक
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये, अभिनेत्री अमिषा पटेल डेटिंग अॅप घोटाळ्याबद्दल बोलताना दिसत आहे ज्याद्वारे फसवणूक करणारे आणि क्लब टिंडर, बंबल इत्यादी डेटिंग अॅप्स वापरून लोकांना फसवतात. जागरूकता निर्माण करत, अमिषा पटेलने ऑनलाइन डेटिंग अॅप फसवणुकीत बळी पडणाऱ्यांना 1945 वर कॉल करून आणि महाराष्ट्र सायबर सेलला अलर्ट करून घटनेची तक्रार करण्याचे आवाहन केले. "आम्हाला फसवले जाणार नाही," असे पोस्टच्या कॅप्शनमध्ये तीने म्हटले आहे.