राजनाधी दिल्लीत दारु आणि बिअरचे सेवन करणाऱ्या लोकांसाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण त्यांना उद्यापासून दारु पिण्याच्या सवयीवर लगाम लावावा लागणार आहे. कारण केजरीवाल सरकारच्या नव्या अबकारी धोरणाअंतर्गत 1 ऑक्टोंबर पासून खासगी दारुची दुकाने बंद राहणार आहेत. दरम्यान, 19 नोव्हेंबर दिल्लीतील दारुची दुकाने विक्रीसाठी पुन्हा एकदा सुरु केली जातील.केजरीवाल सरकारच्या आदेशानुसार, 1 ऑक्टोंबर ते 16 नोव्हेंबर दरम्यान खासगी दारुची दुकाने बंद राहणार आहेत. कारण अबकारी व्यवस्था सुरळीतपणे लागू केली जाऊ शकते.
केजरीवाल सरकारच्या आदेशानुसार, 1 ऑक्टोबर ते 16 नोव्हेंबर पर्यंत खाजगी दारूची दुकाने बंद राहतील जेणेकरून नवीन अबकारी प्रणाली सुरळीतपणे लागू करता येईल. दिल्ली सरकारच्या या निर्णयानंतर, खाजगी दारूची दुकाने यापुढे दारूचा नवीन साठा मागत नाहीत. उर्वरित स्टॉक देखील वेगाने संपत आहे.(Saree Controversy: साडीवरून झालेला वाद अंगाशी आला; दिल्लीतील Aquila रेस्टॉरंट बंद करण्याचे आदेश, विनापरवाना चालू होते)
डीएलएफ गॅलेरिया मॉल, मयूर विहार फेज -1, दिल्ली येथे 13 खाजगी दारू दुकाने असून ज्यांना एल -10 परवाने आहेत. पण त्याच्या परवान्याचे नूतनीकरण होऊ शकले नाही. या दुकानांपैकी एका अकाउंटंटचे काम पाहणाऱ्या करुण सक्सेना यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले, "आम्ही सामान्य दुकान मालक आहोत, आमच्याकडे परवाना नूतनीकरण करण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत.