भारतीय श्रीमंतांची देशाला नापसंती, सोडून जात आहेत आपल देश; या मोठ्या व्यावसायिकाने सरकारकडे जमा केला पासपोर्ट
Representational Image | Economy (Photo Credits: PTI)

भारताचा होत असलेला आर्थिक आणि औद्यागिक विकास, जागतिक पातळीवर भारतीय अर्थव्यवस्थेचे वाढत असलेले महत्व पाहता भारत लवकरच विकसित देशांमध्ये सामील होईल यात शंका नाही. भारताची अर्थव्यवस्था ही मुठभर श्रीमंत लोकांच्या हाती एकवटली आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर भारतातील श्रीमंत लोक भारत सोडून जात असलेले दिसून येत आहेत. अफ्रॅशिया बँक (AfrAsia Bank) आणि संशोधन संस्था न्यू वर्ल्ड वेल्थ (New World Wealth) यांनी ग्लोबल वेल्थ माइग्रेशन रिव्ह्यू 2019 (Global Wealth Migration Review 2019) मध्ये, दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी आपला देश सोडून दुसऱ्या देशात स्थायिक होणाऱ्या श्रीमंतांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मागच्या वर्षी तब्बल 5,000 श्रीमंत भारतीयांनी आपला देश सोडला आहे. सध्या अमेरिका आणि चीनमध्ये चालू असलेल्या व्यापार युद्धामुळे चीनमधील जास्तीत जास्त श्रीमंत देश सोडून गेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रशियाचा नंबर लागतो. आपला देश सोडून स्थायिक होण्यासाठी लोक अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया देशांचा विचार करीत आहेत. या रिपोर्टनुसार येत्या 10 वर्षांमध्ये भारताची अर्थव्यवस्था अजून चांगली होईल, व 2018 पर्यंत इंग्लंड जर्मनी या देशांना मागे टाकून भारत जगातील चौथा सर्वात मोठा संपती बाजार बनेल. मात्र देशातील सक्षम, कर्तृत्ववान आणि कौशल्य असलेले विद्यार्थी परदेशात गेल्याने देशाचे मोठे नुकसान होत आहे. (हेही वाचा: फक्त नीरव मोदी, विजय मल्ल्याच नाही तर तब्बल 36 कर्ज कर्जबुडव्यांंनी केले भारतातून पलायन: ED)

नोकरीसाठी बाहेर जाणाऱ्यांमुळे देशाला गरज असलेले कुशल मनुष्य़बळ इतर देशांकडे जाते. 2017 साली 7 हजार श्रीमंत भारतीय दुसऱ्या देशात स्थायिक झाले आहेत. हिरानंदानी समुहाचे संस्थापक सुरेंद्र हिरानंदानी यांनीही भारतीय पासपोर्ट सरकारकडे परत केला असून, त्यांनी सायप्रस या देशाचे नागरिकत्व स्वीकारले होते. सुखवस्तू जीवनशैली हे यामागील कारण असल्याचे निदर्शनास येत आहे.