विजय मल्ल्या आणि नीरव मोदी (संग्रहित-संपादित प्रतिमा)

देशात गेल्या काही महिन्यांपासून कर्ज बुडवून पलायन केलेल्या निरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी यांची बरीच चर्चा चालू आहे. करोडो रुपयांची कर्जे बुडवून ही मंडळी भारतातून पळून गेली. मात्र आता ईडी (ED)ने न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार फक्त नीरव, विजयच नाही तर तब्बल 36 कर्जबुडव्या लोकांनी भारतातून पलायन केले आहे. नुकतेच ऑगस्टा वेस्टलँड (AgustaWestland)  घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेला संरक्षण क्षेत्रातील दलाल सुशेन मोहन गुप्ता याला जमीन मंजूर झाला असता तर, हाही पळून जाण्याची शक्यता असल्याचे सांगून त्याच्या जामीन अर्जाला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विरोध केला.

सुशेन गुप्ता याच्या खटल्यावर सुनावणी सुरु असताना, या समाजात आपेल संबंध सर्वदूर आहेत, त्यामुळे आपणाला जमीन मंजूर करण्यात यावा असे गुप्ता याने सांगितले होते. मात्र माल्ल्या, ललित मोदी, नीरव मोदी, मेहुल चोक्सी ही मंडळीदेखील इथलीच होती, त्यांचेही या समाजात सर्वदूर संबंध होते तरीही हे लोक पळून गेले. अशाप्रकारे गेल्या काही वर्षांमध्ये 36 कर्जबुडव्यांनी भारत सोडला असल्याचे ईडी वकिलांनी सांगितले. (हेही वाचा: लंडन कोर्टाचा 'विजय मल्ल्या'ला दणका! प्रत्यार्पण विरोधातील याचिका फेटाळली)

सध्या सुशेन गुप्ता याची केस एका महत्वाच्या टप्प्यावर येऊन पोहचली आहे. सुशेनच्या डायरीत उल्लेख केलेला ‘आरजी’ (RG) कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न ईडी करत आहे. तसेच त्याने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यामुळे कोर्टाने 20 एप्रिलपर्यंत जमीन मंजूर करण्यास नकार दिला आहे. दरम्यान विजय मल्ल्याला 'फरार आर्थिक गुन्हेगार' घोषित केले असल्याने, ईडीला त्याच्या मालमत्त्वेचर कारवाई आणि जप्ती करण्याचे अधिकार मिळाले आहेत.