Jnaneswari Express Derailment: जनेश्वरी एक्सप्रेस दुर्घटनेत 11 वर्षापूर्वी मृत घोषीत केलेला व्यक्ती जिवंतच; कुटुंबाने लाटला आर्थिक मोबदला
Jnaneswari Express Derailment (Photo Credit: Twitter)

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) 2010 साली झालेल्या जनेश्वरी एक्सप्रेस दुर्घटनेत (Jnaneswari Express Derailment) मृत घोषीत केलेला एक व्यक्ती जिवंत असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांनीच त्याला मृत घोषीत केले होते. या बदल्यात त्याच्या नातेवाईकांना सरकारी नोकरी आणि आर्थिक भरपाई मिळाली होती. या संदर्भात रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. दरम्यान, रविवारी सीबीआयने त्या व्यक्तीची कसून चौकशी केली. तसेच या प्रकरणात त्याच्या बहिणीला आणि तिच्या वडिलांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. या व्यक्तीच्या कथित मृत्युनंतर त्याच्या बहिणीला रेल्वेकडून सरकारी नोकरी देण्यात आली आहे.

हावडा-मुंबई जनेश्वरी एक्स्प्रेसने 2010 मध्ये झारग्रामच्या सारडीहा येथे समोरून येणाऱ्या मालगाडीला धडक दिली होती. ज्यामुळे एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरले आणि या अपघातात 148 प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात अमृतवन चौधरी नावाच्या व्यक्तीचाही मृत्यू झाल्याचे त्याच्या नातेवाईकांनी दावा केला. तसेच त्यांनी डीएनए नमुन्यातून मृतदेहाची ओळख पटविली. या अपघातानंतर रेल्वेने मृताच्या नातेवाईकांना आर्थिक नुकसान भरपाई व्यतिरिक्त कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची रेल्वेने घोषणा केली. त्यानुसार अमृतवनच्या बहिणाला पूर्व रेल्वेच्या सियालदह विभागातील सिग्नलिंग विभागात नोकरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा- Kerala Road Accident: केरळच्या कोझीकोड-पलक्कड महामार्गावर भीषण अपघात, लॉरी आणि कारच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू

दरम्यान, 11 वर्षानंतर रेल्वेच्या दक्षता विभागाला अमृतवन जिंवत असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार त्यांनी तापासाला सुरुवात केली. दरम्यान, रेल्वे दक्षता विभागाला या प्रकरणातील ठोस पुरावे सापडल्यानंतर सीबीआयकडे हा तपास सोपविण्यात आला. त्यानंतर हे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.