Kerala Road Accident: केरळच्या कोझीकोड-पलक्कड महामार्गावर भीषण अपघात, लॉरी आणि कारच्या धडकेत 5 जणांचा मृत्यू
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

केरळच्या (Kerala) कोझीकोड-पलक्कड महामार्गावर (Kozhikode-Palakkad Highway) भरघाव वेगात असलेल्या लॉरी आणि कारची समोरासमोर धडक (Road Accident) झाल्याने 5 जण जागीच ठार झाले आहेत. ही घटना आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली आहे. या अपघाताची माहिती होताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने कारमधील पाच जणांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी कोझिकोड मेडिकल कॉलेज रुग्णालयात पाठवले आहे. तसेच हा अपघात कशामुळे झाला? हे अद्याप समजू शकले नाही, याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाझीर, सुबैर, मोहम्मद जहीर, असईनर आणि थहीर अशी अपघात मरण पावलेल्या लोकांची नावे आहेत. हे सर्वजण पलक्कड जिल्ह्यातील रहिवाशी असून जवळच्या करीपूरमधील कॅलीकट आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परत येत होते. मात्र, रामनट्टुकरा जवळील पुलिंजोडे येथे आल्यावर त्यांच्या कारला मोठा अपघात झाला. त्यांची कार सिमेंटने भरलेल्या एका लॉरीला धडकली. ज्यामुळे पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती टाईम्स ऑफ इंडियाने दिली आहे. हे देखील वाचा-Gujarat Shocker: मास्क घातला नाही म्हणून पोलिस कॉन्स्टेबलने महिलेवर अनेकदा केला बलात्कार, अशी झाली पोलखोल

दरम्यान, घटनास्थळी उपस्थित पोलिस निरीक्षक म्हणाले, " या अपघातानंतर कारमधील पाचही जण जागीच ठार झाले." अपघातात ठार झालेल्या पाच तरुण हे पलक्कड येथील रहिवासी होते आणि कोझिकोड विमानतळावरून परत येत होते. तसेच अपघाताच्या ठिकाणी दारूच्या बाटल्या सापडल्या असल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले गेले आहे.