गुजरातच्या सुरतमध्ये एका 33 वर्षीय विवाहित महिलेवर मास्क न घातल्याबद्दल पोलिस कॉन्स्टेबलने बलात्कारकेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी हवालदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेचा असा आरोप आहे की, जेव्हा ती दूध खरेदी करायला गेली होती, तेव्हा पोलिसांनी तिला पलसाना येथे त्यांच्या कारमध्ये पळवून नेले. नरेश कपाडिया असे आरोपीचे नाव आहे. बलात्कार पीडितेने पुढील काही महिन्यांमध्ये आरोपींनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान ही घटना घडली होती. (Me Too: 28 वर्षीय मॉडेलचे प्रसिद्ध बॉलिवूड फोटोग्राफर वर बलात्काराचे आरोप; Bandra Police Station मध्ये 9 जणांविरोधात FIR)
आरोपींनी महिलेला पोलिस ठाण्याऐवजी नवसारी रोड येथे नेऊन ठेवले. कापडिया यांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्याने तिचे फोटो काढून तिला ब्लॅकमेलकरण्याचा प्रयत्न ही केला. टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, घटनेच्या वेळी कापडिया हे पलसाना पोलिस ठाण्यात तैनात होते. (Nalasopara Rape Case: नालासोपारा परिसरात 28 वर्षीय महिलेवर बलात्कार, नराधमांना 3 नोव्हेंबर पर्यंत सुनावली पोलीस कोठडी)
मात्र यावर्षी जानेवारीत तक्रारदार महिलेशी झालेल्या त्याच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपीला उमरपारा पोलिस ठाण्यात हलविण्यात आले. दरम्यान, कापडियाच्या पत्नीने बलात्कार पीडित महिला व तिच्या पतीविरूद्ध बारदोली पोलिस ठाण्यात पोलिसांना शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली. या महिलेवर आणि तिच्या पतीवर अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.