Gujarat Tragedy PC X

Gujarat Tragedy:  गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. शुक्रवारी मेश्वो नदीत जणांचा बूडून मृत्यू झाला. तरुण मंडळी नदीत आंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यावेळीस ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी बचावकार्य सुरु झाले. मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेत आठ मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. (हेही वाचा-  गणपती विसर्जन झाल्यानंतर नागरिकांनी घेतला मुर्तीचा शोध, 10 तासांनंतर अखेर सापडली 'ती' गोष्ट)

मिळालेल्या माहितीनुसार, देहगाम तालुक्यातील वसना सागोठी गावचे आठ तरुण मंडळी नदीत पोहण्यासाठी गेले होते. तेव्हा पाण्याचा अंदाजा न आल्याने आठ जण बूडाले. गावकऱ्यांना माहिती मिळताच, त्यांनी बचावकार्याला मदतीसाठी पाचारण केले. घटनास्थळी NDRF टीमकडून मदत आणि बचावकार्य सुरु झाले. त्यानंतर हळू हळू करत एक एक मृतदेह बाहेर काढण्यात आले. नदीतून ८ मृतदेह बाहेर काढले अशी माहिती एसडीएम यांनी दिली. नदीत किती लोक अंघोळीसाठी गेले होते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही त्यामुळे शोध मोहिम सुरु आहे.

आठ जणांचा बूडून मृत्यू 

नदीच्या पाण्याचा अंदाजा न आल्यामुळे आणि पाण्याचा प्रवाहाचा वेग वाढल्याने तरुण बुडाले असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकाच गावातील आठ तरुणांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जाते.

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त 

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात येथील या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. X वरील एका पोस्टमध्ये पीएम मोदींनी लिहिले की, गुजरातच्या देहगाम तालुक्यात बुडून झालेल्या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याच्या वृताने खुप दु: ख झाले आहे. या दुर्घटनेत ज्याने आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या सर्व कुटुंबाप्रति मी शोक व्यक्त करतो.