Nalasopara Rape Case: नालासोपारा परिसरात 28 वर्षीय महिलेवर बलात्कार, नराधमांना 3 नोव्हेंबर पर्यंत सुनावली पोलीस कोठडी
Representational Image | Rape | (Photo Credits: PTI)

Nalasopara Rape Case: नालासोपारा परिसरात 28 वर्षीय महिलेवर बलात्कार, नराधमांना 3 नोव्हेंबर पर्यंत सुनावली पोलीस कोठडी देशभरासह राज्यात दिवसागणिक गुन्हेगारी, बलात्कार, हत्येच्या घटना वाढत आहेत. यावर चाप बसवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र यामधील सर्वाधिक गुन्हे हे बलात्काराचे या वर्षात समोर आले आहेत. हाथरस मधील बलात्कार गुन्हानंतर बहुतांश अशा पद्धतीचे प्रकरणे समोर आली आहेत. याच पार्श्वभुमीवर आता नालासोपारा परिसरात एका 28 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. (Palghar Rape: लग्नाचे आमिष दाखवून सहकारी महिलेवर तब्बल 2 वर्ष बलात्कार करणाऱ्या मुंबईतील डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल)

पीडितेवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांकडून दोन नराधमांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोन्ही आरोपींना येत्या 3 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.(Pune Gangrape: धक्कादायक! पुणे येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार)

याआधी सुद्धा नालासोपारा येथे आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवुन तिच्यावर बलात्कार करत आल्याचे समोर आले होते. तसेच पीडितेने बलात्कार केल्यानंतर आत्महत्या ही केल्याचे दिसून आले होते. या प्रकरणी पीडितेच्या परिवाराने पोलिसांना कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप लगावला होता. त्यांनी असे म्हटले की, बलात्कारच्या घटनेप्रकरणी पीडितेला नको ते प्रश्न विचारले गेले. तर पोलिसांच्या मते 19 सप्टेंबरला तिच्यावर बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणातील आरोपीला ही अटक करण्यात आली होती.