Pune Gangrape: धक्कादायक! पुणे येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार
File Image (Representational Image)

एका 15 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ही घटना पुणे (Pune) जिल्ह्यातील हडपसर (Hadapsar) घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी 2 जणांना अटक करून त्यांच्याविरोधात पोस्को, अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणातील इतर 2 आरोपींचा शोध सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आपल्या आईसोबत भांडण करून रागाच्या भरात घर सोडून बाहेर पडली होती. त्याचवेळी तिच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला. या घटनेने आजूबाजुच्या परिसरात चिंताजनक वातावर निर्माण झाले आहे.

पीडित मुलगी ही मराठवाड्यातील एका छोट्याशा गावातून पोटाची खळगी भरण्यासाठी आई-वडिलांसह पुण्यामध्ये आली होती. पीडित मुलीचे आई-वडील दोघेही मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. 26 ऑक्टोबरला पीडित मुलगी आणि तिच्या आईमध्ये काही कारणामुळे वाद झाला होता. त्यामुळे ती रागाच्या भरात ती घर सोडून बाहेर पडली होती. यावेळी तिला ओळखत असलेल्या एका तरुणाने तुला गावी सोडतो, असे सांगत एका इमारतीच्या फ्लॅटवर घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. तिथून सुटका करून पळाल्यानंतर पीडितला रस्यात एक व्यक्ती भेटला. त्यानेही तिला स्वतःच्या दुचाकीवर बसवून भेकराईनगर येथील एका इमारतीच्या गच्चीवर नेले आणि तिच्यावर पुन्हा एकदा बलात्कार केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर, त्याने त्याच्या आणखी दोन नातेवाईकांना बोलावून घेतले आणि त्यांनीही तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर पीडिताने एका नागरिकाच्या मदतीने तिने हडपसर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत संपूर्ण माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी 2 जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु केला आहे. हे देखील वाचा- Palghar Rape: लग्नाचे आमिष दाखवून सहकारी महिलेवर तब्बल 2 वर्ष बलात्कार करणाऱ्या मुंबईतील डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल

एएनआयचे ट्विट-

याआधी जुलै 2019 मध्ये बीपीओ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दोन आरोपींना जन्मठेपाची शिक्षा सुनावली होती. न्यायमूर्ती बी.पी धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या व्यासपीठखाली ही सुनावणी पार पडली होती.