(Photo Credits: Mumbai Police)

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एका मॉडेलच्या तक्रारीवरून प्रसिद्ध बॉलिवूड फोटोग्राफर (Bollywood Photographer) आणि त्याच्यासह 8 जणांविरूद्ध FIR दाखल केली आहे. या मॉडेलने त्यांच्यावर बलात्काराचे (Rape) आरोप लावलेले आहेत. या प्रकरणामध्ये प्रसिद्ध बॉलिवूड फोटोग्राफर सोबतच एका प्रसिद्ध निर्मात्याचा मुलगा, बॉलिवूड टॅलेंट मॅनेजर आणि निर्मात्यांचा समावेश आहे. अद्याप या प्रकरणात कोणतीही अटक झालेली नाही.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, या मॉडेलने 12 एप्रिल दिवशी सोशल मीडीयामध्ये पोस्ट लिहित तिच्यावर शारिरिक आणि मानसिक अत्याचार कसा झाला याबद्दल सविस्तर पोस्ट लिहलेली आहे. तिने पोलिस अधिकार्‍यांनादेखील पत्र लिहून तिच्यावरील अत्याचाराविरूद्ध तक्रार नोंदवण्यासाठी विनंती केली होती. दरम्यान 26 मे दिवशी या प्रकरणात वांद्रे पोलिस स्थानकामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. नक्की वाचा:  #MeTooनंतर आता #ManToo; महिलांकडून होणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध घुमणार पुरुषांचाही आवाज

ANI Tweet

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 28 वर्षीय मॉडेलने दिलेल्या नोंदवलेल्या तक्रारीमध्ये तिने असा दावा केला आहे की तिच्यावर फोटोग्राफरने 2014 ते 2018 दरम्यान वांद्रे परिसरात बलात्कार केला. खोट्या सबबी पुढे करत तिचा गैरफायदा घेतल्याचेही तिचे आरोप आहे. या प्रकरणी deputy commissioner of police Chaitanya Siriprolu यांनी दुजोरा देत या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान आरोप करण्यात आलेल्या फोटोग्राफरनेही सारे आरोप फेटाळले आहेत. याबद्दल वकील हे प्रकरण कायदेशीरपणे हाताळतील असे सांगितले आहे.