#MeTooनंतर आता #ManToo; महिलांकडून होणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध घुमणार पुरुषांचाही आवाज
#ManToo (संपादित आणि प्रतिकात्मक प्रतिमा)

#MeTooमोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी आपल्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवला आहे. त्यामुळे एरवी सभ्य म्हणून वावरणाऱ्या अनेक पुरुषांना आरोपांच्या छायेत सफाई द्यावी लागत आहे. तर, अनेकांच्या वर्तनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काहींना आपापल्या कार्यक्षेत्रातील संधी, प्रकल्प, उपक्रमांतून माघार घ्यावी लागत आहे. हे सर्व पाहता महिलांवर कशा पद्धतीने अत्याचार होत आहे, हे पुढे येत आहे. मात्र, त्यामुळे केवळ पुरुषच महिलांचे शोषण करतात, केवळ महिलाच पीडित आहेत, असे चित्र उभे राहात आहे. आता हे चित्र फार काळ टिकणार नाही. कारण, आता पुरुषही #MeTooप्रमाणे #ManToo म्हणणार आहेत. #ManToo मोहिमेअंतर्गत महिलांकडून केल्या जाणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध पुरुषही आवाज उठवणार आहेत.

महिलांकडून केल्या जाणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी #ManToo ही मोहीम सुरु झाली आहे. सुमारे १५ लोकांच्या एका समूहाने #ManToo या मोहिमेला सुरुवात केली आहे. या पंधरा जणांमध्ये फ्रान्समधील एका माजी राजकीय नेत्याचाही समावेश आहे. या नेत्यावर यापूर्वी लैंगिक गैरवर्तनाचा आरोप झाला होता. तसेच, त्याला २०१७मध्ये न्यायालयाने या आरोपातून मुक्तही केले होते. #ManToo मोहिमेची सुरुवात एक बिगरशासकीय संस्था चिल्ड्रन्स राईट्स इनिशिएटिव्ह फॉर शेयर्ड पॅरेंटींग (क्रिस्प)ने शनिवारपासून केली.

क्रिस्पचे राष्ट्रीय अध्यक्ष कुमार व्ही यांनी सांगितले की, हा समूह लैंगिक तटस्थता कायद्यासाठी लढा देईन. #MeeToo अंतर्गत खोटे आरोप आणि गुन्हे दाखल करणाऱ्यांविरुद्ध कारवाई व्हावी अशी मागणी करतानाच मी टू ही एक चांगले अभियान आहे. फक्त या आंदोलनात कोणीही कोणावर खोटे आरोप लाऊन त्याचा गैरवापर करु नये इतकेच, असे कुमार व्ही यांनी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले, या अभियानामुळे समाजातील अनेक लोकप्रिय आणि मान्यवर लोकांची प्रतिमा मलीन होत आहे. अनेक पीडित महिला दशकानंतरही आरोप करत आहेत. जर त्यांच्या आरोपात तथ्य असेल तर, अशा महिलांनी सोशल मीडियात बोलण्याऐवजी थेट कायदेशीर कारवाई करण्यासाठी न्यायालयाकडे गेले पाहिजे. त्यासाठी त्यांनी कायदेशीर सल्लाही घ्यायला हवा, असेही कुमार म्हणाले.

दरम्यान, व्ही कुमार बोलत असताना फ्रान्सचे माजी राजकीय नेते पास्कल मजूरियर हेसुद्धा या वेळी उपस्थित होते. पास्कल यांच्यावर त्यांच्या मुलीनेच लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. मात्र, २०१७मध्ये न्यायलाने त्यांना आरोपमुक्त केले होते. पास्कल यावेळी म्हणाले की, #ManToo हे आंदोलन मी टू मोहिमेला उत्तर देण्यासाठी नाही. तर, पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणण्यासाठी आहे. कारण, आपल्या समाजात महिलांकडून केल्या जाणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध बोलले जात नाही. (हेही वाचा, #Metoo : मोदी सरकारमधील पहिली विकेट, एम जे अकबरांचा मंत्रीपदाचा राजीनामा)

पुढे बोलताना पास्कल यांनी सांगितले की, पुरुषही खरे दु:खी आहेत. तेही पीडित आहेत. पण, महिलांकडून केल्या जाणाऱ्या अत्याचाराबाबत ते पुढे येऊन बोलत नाहीत. आम्ही महिलांवरिली अत्याचाराविरुद्ध कायदा बनवतो. चांगली गोष्ठ आहे. पण, आपण हेही विसरता कामा नये की, मानवतेचा आर्धा भाग हा पुरुषही आहे.