एम जे अकबर (Photo credit: IANS)

सध्या देशभरात MeToo या मोहिमेने जोर धरला आहे. सुरूवातीला केवळ हॉलिवूड आणि बॉलिवूड पुरते मर्यादीत असलेली MeToo मोहिम आता मोदी सरकारपर्यंत पोहचली आहे. एम जे अकबर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

पत्रकार प्रिया रमानी यांनी एम जे अकबर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला आहे. सुरूवातीला अकबर यांनी सारे आरोप खोटे असल्याचे सांगत रमानीवर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. मात्र वाढत्या दबावाखाली एम जे अकबर यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

 

एम जे अकबरांची 97 वकिलांची टीम दिल्लीच्या न्यायालयात कायदेशीर लढाई लढत आहे. रमानींविरूद्ध दिल्ल्ली कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला आहे. 18 ऑक्टोबरला या प्रकरणी न्यायालयात सुनावणी होणार आहे.