Government Job for Engineers: इंजिनीअर्ससाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या कशी आहे अर्ज प्रक्रीया
Representational Image (Photo Credit: File Image)

देशात दरवर्षी इतर शिक्षण शाखेच्या तुलनेत सर्वाधित इंजिनीअर (Engineer) पदवीधर (Graduate) होतात. इंजिनीअरींग (Engineering) म्हणजे दर्जेदार पदवी. पण गेल्या काही वर्षात इंजिनीअरींगचं शिक्षण घेण्याऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. याचा सरळ परिणाम इंजिनीअर पदांच्या नोकऱ्यावर (Jobs) होत आहे. इंजिनीअरींग पास करणारे अधिक आणि नोकरीची संख्या मात्र कमी झाली आहे. त्यामुळे विविध शाखेतील (Branches) इंजिनीअर नोकरीच्या शोधात एका शाखेतून दुसऱ्या शाखेत नोकरी करताना दिसतात. पण आता इंजिनीअरला सरकारी नोकरीची (Government Job) संधी मिळणार आहे. ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅन्डर्ड (Bureau Of Indian Standard) म्हणजे भारतीय मानक ब्यूरोमध्ये इंजिनीअरसाठी सरकारी नोकरीची संधी आहे.

 

संबंधित नोकरीच्या विस्तृत माहिती ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅन्डर्डच्या अधिकृत वेबसाईटवर (Website) दिलेली असुन शैक्षणिक अर्हता (Educational Qualification), वयोमर्यादा (Age Limit), अनुभव (Experience), अर्जाची शेवटची तारीख (Last Date Of Registration) यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट bis.gov.in द्वारे अर्ज करू शकतात. भारतीय मानक ब्यूरो अंतर्गत इंजिनीअर पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. संबंधित पदभरतीसाठी ऑनलाईन (Online Registration) माध्यमतून अर्ज भरता येणार आहे. अर्ज करण्यासाठी 26 ऑगस्ट (August) ही शेवटची तारीख आहे. तरी पुढील दोन आठवड्यात इच्छुक उमेदवारांना ही अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. (हे ही वाचा:- Job Recruitment: कलेक्टर ऑफिसमध्ये SSC उत्तीर्णांना नोकरीची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती)

 

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे (Resume), दहावी (SSC), बारावी (HSC) आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं (Degree Certificate), शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate), मागासवर्गीय उमेदवारांना जातीचा दाखला (Caste Certificate) , आधारकार्ड (Aadhar Card) किंवा लायसन्स (Driving Licence) आणि पासपोर्ट साईझ फोटो (Passport Size Photo) हे कागदपत्रे सोबत जोडणे अनिवार्य आहे. ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅन्डर्ड म्हणजे हे केंद्र सरकारच्या अख्तारीत येत असल्याने पदवीधर अभियंता आवश्यकतेनुसार देशात कुठेही भरती केले जाऊ शकते. या नोकरीसाठी दरमहा 50 हजार वेतन देण्यात येणार आहे. तरी नोकरीकरीता अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 पेक्षा अधिक नसावे. निवड प्रक्रियेत उमेदवारांना प्रथम शॉर्टलिस्ट (Shortlist) केले जाईल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना व्यावहारिक मूल्यमापन, लेखी मूल्यांकन, तांत्रिक ज्ञान मूल्यांकन आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल.