Job Recruitment: कलेक्टर ऑफिसमध्ये SSC उत्तीर्णांना नोकरीची संधी, जाणून घ्या सविस्तर माहिती
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

हल्ली मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणी नोकरीच्या (Job) शोधात आहेत. तसेच खासगी क्षेत्रात नोकरीसाठी (Private Jobs) मोठी स्पर्धा आहे शिवाय त्या नोकरीची लांब कालवधीची हमी देखील कमी असते. म्हणून सरकारी नोकरी (Government Jobs) मिळालेली सर्वोत्तम. पण सरकारी कार्यालयात (Government Office) नोकरीची संधी हवी असल्यास त्यासाठी पदव्युत्तर शिक्षण किंवा विशेष प्रवेश परिक्षा द्याव्या लागतात पण आता दहावी (SSC) पास विद्यार्थांना देखील सरकारी कार्यालयात नोकरीची संधी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग (Sindhudurg Collector Office) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. तरी यासाठी नोंदणी प्रक्रीया, शैक्षणिक पात्रता, पगार किती असेल हे जाणून घेवूया.

 

सिंधुदुर्ग कलेक्टर ऑफिसमध्ये चौकीदार/ शिपाई (Watchman/ Peon) आणि  लिपिक टंकलेखक (Clerk Typist) पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यात येणार आहे. वॉचमन पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 10 हजार रुपये इतका पगार दिला जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मराठी (Marathi) आणि हिंदी (Hindi) भाषेचे ज्ञान, ड्रायविंग (Driving) आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच या पदभरतीसाठी अर्ज करताना रेझ्युमे (Resume), दहावी, बारावी (HSC) आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं (Educational Certificate), शाळा (School) सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला फक्त मागासवर्गीय उमेदवारांसाठी (Caste Certificate), ओळखपत्र (ID Proof) आणि पासपोर्ट साईझ फोटो (Passposrt Photo) हे कागदपत्रे सोबत जोडणे आवश्यक आहे. तर क्लर्क टायपिस्ट या पदावर निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 15 हजार रुपये इतका पगार दिला जाणार आहे. क्लर्क टायपिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना  मराठी आणि इंग्रजी टायपिंग, एमएससीआयटीचे (MSCIT) ज्ञान आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच उमेदवाराकडे क्लर्क टायपिस्ट पदाचा किमान अनुभव असावा. ( हे ही वाचा:- Indian Railway Jobs: भारतीय रेल्वेत नोकरीची मोठी संधी, रेल्वे भरती बोर्डाकडून RRB GROUP D परिक्षेची तारीख जाहीर)

 

जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग (Sindhudurg Collector Office) येथे असलेल्या नोकरीच्या संधीची माहिती ऑनलाईन (Online) माध्यमातून प्रसिध्द करण्यात आलेली आहे.  नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास कलेक्टर ऑफिसच्या अधिकृत वेबसाइटवर सविस्तर माहिती देण्यात आली आहे.या वेबसाईटवर कलेक्टर ऑफिस जॉब (Collector Office Job) नावाने नोटिफिकेशन (Collector Office Job) प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात शैक्षणिक पात्रता (Educational Qualification), वयोमर्यादा (Age Limit), अनुभव (Experience), अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. तरी या अधिकृत वेबसाईटला भेट देत आणि तुमच्या शिक्षणासह वयोमर्यादेची पडताळणी करता तुम्हाला नोकरीसाठी सहज अर्ज दाखल करता येणार आहे.