Indian Railway (Photo Credits: File Photo)

भारतीय रेल्वे भरती बोर्डाकडून RRB GROUP D परिक्षा घेणार असल्याची घोषणा 20 जून 2022 रोजी करण्यात आली होती. तरी आज ही परिक्षा नेमकी कधी होणार याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. RRB GROUP D CBT ही परिक्षा 17 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2022 या दरम्यान घेण्यात येणार असुन या परिक्षेच्या माध्यमातून 1,03,769 जागांची पदभरती करण्यात येणार आहे.  ट्रॅक मेंटेनर ग्रेड-IV (Track Maintain Grade 4), हेल्पर/सहाय्यक इलेक्ट्रिकल विभाग (Helper in Electrical Department), हेल्पर/सहाय्यक मेकॅनिकल विभाग (Helper in Mechanical Department), हेल्पर/सहाय्यक S&T विभाग (Helper in S&T Department) तसेच असिस्टंट पॉइंट्समन लेव्हल-1 (Assistant Pointsman Level 1)  अशा विविध विभागांमध्ये पदभरती केल्या जाणार आहे.

 

रेल्वे भर्ती बोर्ड RRB Group D स्तर 1, RRB NTPC आणि अशा विविध परिक्षा घेत तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देताना दिसते.  तरी इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांसाठी ही परिक्षा एक सुवर्ण संधी असुन या परिक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरी पटकावनं सहज शक्य आहे. तरी 1 लाख 3 हजार 769 रिक्त पदांवर होणार असलेल्या भरती प्रक्रीयेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी 42 हजार 355 पदे, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 15 हजार 559 पदे, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 7 हजार 984 पदे, इतर मागासवर्गीयांसाठी 27 हजार 378 पदे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 10 हजार 381 पदांचा समावेश आहे. (हे ही वाचा:- CAT 2022: CAT परिक्षेच्या नोंदणीला आजपासून सुरुवात, जाणून घ्या कशी असेल नोंदणी प्रक्रीया)

 

RRB GROUP D परिक्षा अनेक टप्प्यांमध्ये घेतली जाईल. आरआरबी ग्रुप डी पहिल्या टप्प्याची परीक्षा 17 ऑगस्ट 2022 ते 25 ऑगस्ट 2022 या कालावधीत पार पडणार असली तरी इतर टप्प्यांच्या परीक्षेच्या तारखाही लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत. उमेदवार या भरती आणि परीक्षेसंदर्भातील अधिक माहितीसाठी rrbcdg.gov.in या अधिकृत वेबसाईटवर (Website) जाऊन संबंधीत माहिती सविस्तर वाचू शकतात.