Exam | Image used for representational purpose | (Photo Credits: Unsplash.com)

CAT 2022 म्हणजे कॉमन अडमिशन टेस्टच्या (Common Admission Test) नोंदणी प्रक्रीयेला आजपासून  सुरुवात झाली आहे. https://iimcat.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवर (website) संबंधित माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. तरी 3 ऑगस्ट म्हणजे आज सकाळी 10 वाजतापासून या  परिक्षेच्या रेजिस्ट्रेशन (registration) प्रक्रीयेला सुरुवात झाली आहे. तरी इच्छुक आणि पात्र विद्यार्थांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधीत नोंदणी प्रक्रीयेसाठी एक महिना 10 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. म्हणजे 14 सप्टेंबर या दिवशी  CAT परिक्षेच्या नोंदणीचा शेवटचा दिवस असेल. तसेच या परिक्षेचं अडमिशन कार्ड 27 ऑक्टोबर 2022 पासून डाऊनलोड (Download) करता येणार आहे. तर 27 नोव्हेंबर 2022 रोजी CAT 2022 म्हणजे कॉमन अडमिशन टेस्ट घेण्यात येईल.

 

जाणून घ्या कशी कराल CAT 2022 परिक्षेसाठी नोंदणी :-

  •  https://www.iimcat.ac.in/ या अधिकृत वेसाईटवर जा.
  •  त्यानंतर लॉग इन करा किंवा तुम्ही पहिल्यादाचं नोंदणी करत असल्यास तुमची प्रोफाईल रेजिस्टर करा.
  • तुम्ही लॉग इन केल्यावर तिकडे अपलिकेशन फॉर्म येईल तो भरा.
  • संपूर्ण फॉर्म भरुन झाल्यावर तिकडे सबमिट बटण येईल त्यावर क्लीक करा
  •  तुम्ही भरलेला संपूर्ण फॉर्म डाऊनलोड बटणवर क्लीक करुन फॉर्म डाऊनलोड करा. (हे ही वाचा:-FYJC Admissions 2022-23: 11वी प्रवेशासाठी Non-Creamy Layer सर्टिफिकेट सादर करायला विद्यार्थ्यांना मिळणार 3 महिन्यांची मुदत)

 

CAT 2022 परिक्षा देशातील १५० शहरात घेण्यात येणार आहे. फॉर्म भरताना विद्यार्थास त्यापैकी कुठलीही ६ शहर नमूद करायची आहेत. या परिक्षेचा एकूण कालवधी १२० मिनिट म्हणजे २ तास असेल. तर हा पेपर सेक्शन १, सेक्शन २ आणि सेक्शन ३ अश्या तीन भागांमध्ये विभागलेला असेल.