Earthquake in Delhi-NCR:  दिल्ली-एनसीआर परिसरात दीड महिन्यात 11 वेळा भूकंप, मोठ्या आपत्तीचे संकेत; बुधवारीही पुन्हा बसले धक्के
Earthquake (Photo Credits: ANI)

राजधानी दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR) परिसरात गेल्या दीड महिन्यात तब्बल 11 वेळा भूकंपाचे धक्के बसले. राजधानी दिल्ली बुधवारीही (3 जून 2020) भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरली. या भूकंपाचा केंद्रबिंदू नोएडा येथे नोंदवला गेला.. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (National Earthquake Science Center) द्वारा प्राप्त माहितीनुसार भूकंपमापन यंत्रावर या भूकंपाची नोंद 3.2 इतकी झाली. अभ्यासकांचे म्हणने असे की, राजधानी दिल्लीत सातत्याने भूकंप (Earthquake) होणे हे धोक्याचे संकेत आहेत.सांगितले जात आहे की, दिल्ली-एनसीआर येथे पृथ्वीच्या पोटात प्लेटो कार्यरत झल्याने उर्जा बाहेर पडत आहे. ज्यामुळे भूकंपाचे धक्के जाणवतात.

राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र (एनसीए) ने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली एनसीआर येथे 12, 13 आणि 16 एप्रिल या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर मे महिन्यातही भूकंपाचे धक्के जाणवण्याचा घटनाक्रम कायम राहिला. 6, 10, 15 आणि 28 मे या दिवशी या ठिकाणी भूकंप जाणवला. प्रामुख्याने दिल्ली-फरीदाबाद एनसीआर मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर 29 मे या दिवशी पुन्हा दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू रोहतक होता. दरम्यान, या काळात राजस्थान राज्यात 4 आणि हिमाचल प्रदेश राज्यात 6 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. विशेष म्हणजे या भूकंपाची तीव्रता 2.2 ते 4.5 रिस्टर स्केल इतकी राहिली. या पेक्षाही अधिक तीव्रतेचा भूकंप आला असता तर मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असते.

भूकंपाच्या तीव्रतेनुसार देश चार सिस्मिक झोन (2,3,4,5) मध्ये विभागण्यात आला आहे. दिल्ली-एनसीआर झोन 4 मध्ये येतो. दिल्ली एनसीआर हा प्रदेश झोन 4 मध्ये येतो. या ठिकाणी 7 ते 8 रिस्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप येऊ शकते अशी शक्यताही वर्तवली गेल