PM Narendra Modi (फोटो सौजन्य - ANI)

Earthquake In Myanmar-Thailand: म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या भूकंपामुळे (Earthquake In Myanmar-Thailand) प्रचंड विनाश झाला असून लोकांमध्ये भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रिश्टर स्केलवर 7.7 तीव्रतेच्या या भूकंपामुळे (Earthquake) इमारती हादरल्या, रस्त्यांना भेगा पडल्या आणि सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. या संकटाच्या वेळी, भारताने शेजारील भूकंपग्रस्त देशाला तातडीने मदतीचा हात पुढे केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी याबाबत शोक व्यक्त करताना म्हटले आहे की, भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना मदत कार्यासाठी सतर्क राहण्यास सांगितले जेणेकरून बाधित लोकांना लवकरात लवकर मदत मिळू शकेल आणि जीवित आणि मालमत्तेचे नुकसान कमीत कमी करता येईल. (हेही वाचा - Myanmar Earthquake: म्यानमारमध्ये विनाशकारी भूकंपामुळे मशीद उद्ध्वस्त! 20 जणांचा मृत्यू, ईदचा आनंद शोक सभेत बदलला)

म्यानमार आणि थायलंडमध्ये भूकंपामुळे मोठे नुकसान -

म्यानमार आणि थायलंडमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे अनेक शहरांमध्ये प्रचंड नुकसान झाले. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.7 इतकी होती, जी अत्यंत प्राणघातक होती. भूकंपाच्या धक्क्यांमुळे थायलंडच्या अनेक भागात इमारती हादरू लागल्या आणि रस्त्यांवर भेगा पडल्या. याशिवाय, म्यानमारमध्ये अनेक इमारतींचे नुकसान झाले. स्थानिक प्रशासन मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. या विनाशकारी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारताने तात्काळ मदतीचे आश्वासन दिले असून बाधित भागात मदत करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भयानक नैसर्गिक आपत्तीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आणि सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला. मोदींनी म्हटलं आहे की, मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो. भारत सर्वतोपरी मदत करेल.' गरजूंना तातडीने मदत पोहोचवता यावी यासाठी पंतप्रधान मोदींनी भारतीय अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले. तसेच, परराष्ट्र मंत्रालयाला (MEA) म्यानमार आणि थायलंड सरकारांशी संपर्कात राहण्यास सांगितले आहे, जेणेकरून गरज पडल्यास मदत करता येईल.