Myanmar Earthquake (फोटो सौजन्य - X/@BNONews)

Myanmar Earthquake: आज म्यानमार (Myanmar)मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपात (Earthquake) एक मशीद उद्ध्वस्त (Mosque Destroyed) झाली. रमजानच्या शेवटच्या शुक्रवारी झालेल्या विध्वंसामुळे मुस्लिम समुदायात शोकाचे वातावरण आहे. भूकंपामुळे मंडाले शहरात मशीद कोसळून 20 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अनेक लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. मशिदीचे ढिगाऱ्यात रूपांतर झाल्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत.

याशिवाय, म्यानमारमधील तौंगू येथे युद्ध निर्वासितांना आश्रय देणारा मठ कोसळल्याने मुलांसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. भूकंपामुळे मंडाले विद्यापीठात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आणि आग लागल्याचे वृत्त आहे, ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. स्थानिक माध्यमांनुसार, शक्तिशाली भूकंपामुळे मंडालेमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (हेही वाचा - Earthquake In Myanmar and Delhi-NCR: म्यानमारमध्ये 7.2 रिश्टर स्केलचा भूकंप)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आज पहिल्यांदाच म्यानमारची जमीन भूकंपाच्या धक्क्यांमुळे हादरली. या देशातील पहिल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7 इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू मध्य म्यानमारमधील मोनिवा शहरापासून सुमारे 50 किलोमीटर (30 मैल) पूर्वेस, जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर आढळला. पहिल्या भूकंपानंतर, एकामागून एक अनेक भूकंपाचे धक्के बसले आणि त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.8 ते 4 दरम्यान मोजली गेली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, म्यानमारमधील भूकंपानंतर बँकॉक आणि चीनमध्ये भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के भारतापर्यंत जाणवले. बँकॉकमध्ये 7.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झाला. इमारती उद्ध्वस्त झाल्या आणि पूल कोसळले. लोक जीव वाचवण्यासाठी पळताना घराबाहेर पळताना दिसले.