Sharjah Building Fire: शारजाहमधील इमारतीला लागलेल्या आगीत दोन भारतीयांचा मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
Sharjah Building Fire (PC - X/@Horizonnews07)

Sharjah Building Fire: शारजाह (Sharjah) च्या अल नहदा भागात गुरुवारी रात्री 750 अपार्टमेंटसह नऊ मजली निवासी टॉवरला आग (Fire) लागली. संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये या आगीत पाच रहिवाशांचा मृत्यू झाला आणि 44 जण जखमी झाले. ठार झालेल्यांमध्ये दोन भारतीय रहिवाशांचाही समावेश होता. भारतातील ध्वनी अभियंता मायकेल सत्यदास हा या आगीचा बळी ठरला.

सत्यदास यांनी दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर (DWTC) मधील DXB Live येथे ध्वनी अभियंता म्हणून काम केले होतं. त्यांच्या भावाने सोशल मीडिया शेअर केलेल्या श्रद्धांजली पोस्टनुसार, ब्रुनो मार्स आणि AR रहमान सारख्या कलाकारांच्या मैफिलींमध्ये सत्यदासने पडद्यामागे महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. (हेही वाचा -Mozambique Boat Sank: दक्षिण आफ्रिकेत मोठी दुर्घटना, स्थलांतरित लोकांचे जहाज समुद्रात बुडालं)

या आगीत बळी पडलेली दुसरी भारतीय व्यक्ती ही मुंबईतील 29 वर्षीय महिला होती. तिचे नुकतेच फेब्रुवारीत लग्न झाले होते. मृत महिलेच्या मित्राने खलीज टाईम्सला सांगितले की, त्यांनी फेब्रुवारीमध्ये मदिना येथे लग्न केले. त्यांच्या लग्नानंतर, ते अल नहदा येथील इमारतीत एकत्र राहायला गेले जेथे ही दुःखद घटना घडली. तिच्या पतीची प्रकृती चिंताजनक आहे. (हेही वाचा- अमेरिकेत मोठा हवाई अपघात टळला! साउथवेस्ट एअरलाइन्सच्या बोईंग 737 चे इंजिन काउलिंगचा भाग तुटल्याने इमर्जन्सी लँडिंग)

डॉक्टरांनी त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचं सांगितलं आहे. आम्ही सर्व त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहोत, असंही मृत महिलेच्या मित्राने सांगितले. भारतीय वाणिज्य दूतावासाने मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना पाठिंबा दिल्याची पुष्टी केली.(हेही वाचा - Man Chop His Wife Into Pieces: धक्कादायक! क्रूर पतीने पत्नीच्या मृतदेहाचे केले 200 हून अधिक तुकडे; गुगलवर शोधले पत्नीच्या हत्येचे फायदे)

तथापी, त्यांचे कुटुंबीय संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) पोहोचले आहेत. आगीच्या कारणाचा अधिकारी अद्याप तपास करत आहेत. सामाजिक कार्यकर्ते अशरफ थामरसेरी यांनी सांगितलं की, भारतीय महिलेला आवश्यक प्रक्रियेनंतर यूएईमध्ये दफन केले जाऊ शकते.