Mozambique Boat Sank: दक्षिण आफ्रिकेत (South Africa) एक मोठी दुर्घटना घडली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मोजांबित देशात उत्तरेच्या समुद्री किनाऱ्याजवळ एक जहाद बुडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 91 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे देशात एकच खळबळ उडाली आहे. जहाजातून लोकांना वाचवण्याचे काम सुरु आहे. जहाजावर 130 लोक होते अशी माहिती समोर आली आहे. (हेही वाचा- अमेरिकेत मोठा हवाई अपघात टळला! साउथवेस्ट एअरलाइन्सच्या बोईंग 737 चे इंजिन काउलिंगचा भाग तुटल्याने इमर्जन्सी लँडिंग
Mozambique Boat Sank:
मिळालेल्या माहितीनुसार,दक्षिण आफ्रिकेच्या मोजांबिक देशातील किनारपट्टीजवळील समुद्रात ही घटना घडली. नामपुला प्रोविंस नावाच जहाज आयलॅंडच्या दिशेने जात होते त्यावेळी हे जहाज समुद्रात बुडलं अशी माहिती आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच, समुद्रात बचाव कार्य सुरु झाले आहे. एका अधिकाऱ्यांने माहिती दिली की, या जहाजावर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे जहाज पाण्यात बुडलं असावं.या घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मृतांमध्ये काही लहान मुलांचा ही समावेश आहे. बचाव कार्य सुरु होते त्यांनी 5 जणांना वाचविण्यात यश मिळवले आहे. धक्कादायक म्हणजे प्रवाशी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत होते. मोजांबिकामध्ये गेल्या काही दिवसांपासून 15 हजारांपेक्षा जास्त लोकांना कॉलरचा आजार झाल्याचे आढळून आले. आपला जीव वाचवण्यासाठी लोकांचे स्थलांतर सुरु होते. तेवढ्यात मोठी दुर्घटना घडली. या घटनेमुळे देशात एकच खळबळ उडाली आहे.