
Bangladesh National Cricket Team vs Netherlands National Cricket Team 2nd T20: बांगलादेश आणि नेदरलँड्स यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसरा सामना सोमवार, 1 सप्टेंबर रोजी सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. बांगलादेशने या मालिकेतील पहिला सामना जिंकून आघाडी घेतली आहे. याआधी त्यांनी यूएईमध्ये पाकिस्तानवर 2-1 अशी मालिका जिंकली होती. त्यामुळे बांगलादेशचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. जर ते दुसरा सामना जिंकले तर मालिका 2-0 ने जिंकून खिशात टाकतील आणि आशिया कपपूर्वी आणखी भक्कम तयारी करतील.
नेदरलँड्ससाठी हा सामना मालिकेत टिकून राहण्यासाठी महत्त्वाचा आहे. पहिल्या सामन्यात त्यांना बांगलादेशी गोलंदाजांविरुद्ध मोठी झुंज द्यावी लागली. आता स्कॉट एडवर्ड्सच्या नेतृत्वाखालील संघ स्थानिक परिस्थितींशी जुळवून घेऊन चांगली लढत देण्याच्या प्रयत्नात असेल.
बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स दुसरा t20 सामना किती वाजता सुरू होईल?
बांगलादेश-नेदरलँड्स मालिकेतील दुसरा t20 सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५:३० वाजता सुरू होईल.
बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स दुसरा t20 सामना कुठे खेळवल जाणार आहे?
बांगलादेश आणि नेदरलँड्स यांच्यातील दुसरा t20 सामना सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.
बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स दुसरा t20 सामना भारतात कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल?
बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स t20 सामन्यांचे टीव्ही प्रसारण होणार नाही.
बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स दुसरा t20 सामना भारतातून ऑनलाइन कुठे पाहणार?
बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स दुसरा t20 सामना फॅनकोड अॅप/वेबसाइटवर उपलब्ध असेल.