
Ravichandran Ashwin: भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) अलीकडेच आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली होती. गेल्या मोसमात तो चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळला होता, पण त्याची कामगिरी फारशी चांगली नव्हती. वाढत्या वयामुळे अश्विनने आयपीएलला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याने इतर परदेशी लीगमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता आयपीएलनंतर अश्विनने यूएईमध्ये खेळण्याची इच्छा दर्शवली आहे.
अश्विनला आयएलटी-20 लीगमध्ये खेळण्याची इच्छा
आयएलटी-20 (ILT20) चा पुढील हंगाम 2 डिसेंबर ते 4 जानेवारीपर्यंत यूएईमध्ये खेळला जाईल. या लीगसाठी होणाऱ्या लिलावात (ऑक्शन) सहभागी होण्याची इच्छा आर अश्विनने व्यक्त केली आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, अश्विन म्हणाला की, 'मी आयोजकांच्या संपर्कात आहे. मला आशा आहे की ऑक्शनसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर एखादा संघ मला विकत घेईल.'
🚨R Ashwin confirms his interest to participate in the upcoming edition of the ILT20
"Yes, I am in talks with the organisers. Hopefully, I will have a buyer if I register for the auction" Ashwin told Cricbuzz pic.twitter.com/CRleVhUVex
— Cricbuzz (@cricbuzz) August 31, 2025
हे देखील वाचा: करामती Rashid Khan ठरला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘नंबर वन’ गोलंदाज, टिम साऊदीला पछाडत रचला इतिहास
मोठी रक्कम मिळण्याची शक्यता
नवीन हंगामासाठी आयएलटी-20 चा लिलाव 30 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे. खेळाडूंच्या रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख 10 सप्टेंबर आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच आयएलटी-20 मध्ये लिलाव पद्धत वापरली जात आहे. यापूर्वी ड्राफ्ट सिस्टीममधून खेळाडूंची निवड होत होती. त्यामुळे यंदाच्या हंगामात आर अश्विन या लीगमध्ये खेळताना दिसू शकतो, ज्यामुळे त्याला मोठी रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
अश्विनची IPL कारकीर्द
आपल्या आयपीएल कारकिर्दीत आर अश्विनने पाच वेगवेगळ्या संघांचे प्रतिनिधित्व केले. यात चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघांचा समावेश आहे. या प्रवासात अश्विनने 221 सामने खेळले, ज्यात त्याने गोलंदाजी करताना 187 विकेट्स घेतल्या.