Canada's Biggest Gold Heist: कॅनडामध्ये सर्वात मोठी सोने चोरी; भारतीय वंशाच्या पुरुषांना अटक
Toronto Airport Gold Heist | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Netflix-worthy case: एप्रिल 2023 मध्ये झुरिच, स्वित्झर्लंड येथून निघालेल्या टोरंटो पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कोट्यवधी डॉलरच्या सोन्याच्या शिपमेंटच्या चोरीच्या (Gold Heist Toronto Pearson Airport) प्रकरणी कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी भारतीय वंशाच्या नऊ जणांना अटक केली आहे. ही चोरी घडवून आणणाऱ्या गटात एअर कॅनडाच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एप्रिल 2023 मध्ये टोरंटोच्या पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मालवाहू कार्गो सेवेतील सोन्याचा साठा चोरीला (Gold Robbery Toronto) घेल्याची घटना घडली होती. हे सोने तब्बल 20 दशलक्ष कॅनडॉलर म्हणजेच जवळपास 15 दशलक्ष डॉलर इतक्या किमतीचे होते. भारतीय रुपयांमध्ये सांगायचे झाले तर एकशे कोटी पंचवीस कोटी सदतीस लाख साठ हजार सातशे पन्नास रुपये (₹1 253 760 750) रुपये इतके त्याचे मुल्य होते. याच चोरीमध्ये तब्बल 2.5 दशलक्ष डॉलर इतक्या रकमेच्या कॅनडॉलर नोटाही चोरीस गेल्या होत्या.

कॅनडाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चोरी

कॅनडाच्या आजवरच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चोरी मानली जात आहे. इतक्या मोठ्या रकमेचे सोने आणि रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेल्याने खळबळ उडणे सहाजिक होते. या नऊ जणांना अटक करण्यात यश आल्याने एक मोठा आणि भक्कम पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. ही चोरी घडली कशी याचीही मोठी रंजक कहाणी आहे. पोलिसांनी तर या घटनेचे वर्णन नेटफ्लिक्स मालिकेसाठी अगदी अचूक कथा, असेच केले आहे. काय आहे प्रकरण घ्या जाणून. (हेही वाचा, दुसऱ्या जागतिक युद्धानंतरची सर्वात मोठी चोरी; जर्मनीच्या वस्तुसंग्रहालयातून अब्जावधी रुपयांचे दागिने गायब)

नेटफ्लिक्स मालीकेसाठी योग्य कथा

कॅनडातील पील प्रादेशिक पोलीस प्रमुख निशान दुरैप्पा यांनी या चोरीचे वर्णन नेटफ्लिक्स मालीकेसाठी योग्य कथा असे केले आहे. या दरोड्याबद्दल माहिती देताा त्यांनी म्हटले आहे की, या चोरी प्रकरणात पकडण्यात आलेल्या संशयितांमध्ये एअर कॅनडा विमानतळाचे माजी कर्मचारी आणि दागिन्यांच्या दुकानाच्या मालकाचा समावेश आहे. ज्यांनी चोरीसाठी आवश्यक तपशील पुरवला होता. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये सर्व संशयित हे 25 ते 54 वर्षे वयोगटातील पुरुष आहेत. हे सर्वजण टोरंटो प्रदेशातील आहेत. दावा केला जात आहे की, यामध्ये भारतीय वंशाच्या पुरुषांचाही समावेश आहे. (हेही वाचा, धक्कादायक! या वर्षातील सर्वात मोठी सायबर चोरी; 1.3 दशलक्षपेक्षा जास्त लोकांचे कार्ड डिटेल्स झाले लीक)

चोरलेल्या मालमत्तेचा काही भाग जप्त

पील प्रादेशिक पोलीस प्रमुख निशान दुरैप्पा यांनी माहिती देताना सांगितले की, आरोपींनी ही मोहीम अत्यंत काळजीपूर्वक आखली होती. आरोपींपैकी एका माजी कर्मचाऱ्याने तर शिपमेंट परिसराचा पोलिस दौरा देखील केला होता. संशयीत आरोपींना अटक करण्यात आल्याने या प्रकरणाचा काहीतरी धागादोरा पोलिसांना मिळाला आहे. दरम्यान, पील पोलिसांनी चोरलेल्या मालमत्तेचा काही भाग जप्त केला आहे, ज्यात 430,000 कॅन डॉलर रोख आणि अंदाजे 89,000 कॅन डॉलर किमतीच्या अनेक सोन्याच्या बांगड्या आहेत. प्रकरणाचा तपास आणि आरोपींची चौकशी अद्यापही सुरुच आहे. (हेही वाचा, Biggest Car Thief: सर्वात मोठा कार चोर Anil Chauhan पोलिसांच्या ताब्यात; आतापर्यंत चोरल्या आहेत 5,000 हून अधिक गाड्या, 180 गुन्हे दाखल)

काय आहे प्रकरण?

ब्रिंक कंपनी स्वित्झर्लंडमधील झुरिच येथून टोरंटोसाठी मौल्यवान वस्तूंची वाहतूक करत होती. या वाहतुकीदरम्यान ही चोरी झाली. गुन्हेगारांनी कार्गोवर दावा सांगण्यासाठी फसव्या एअर वेबिलचा वापर केला होता. त्यामुळे ब्रिंकचे कर्मचारी येताच ते गायब झाले होते. ओळखल्या गेलेल्या संशयितांपैकी, परमपाल सिद्धू (54) याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर सिमरन प्रीत पानेसर (31) हा फरार आहे. या प्रकरणावरुन ब्रिंक्स कंपनी आणि एअर कॅनडा यांच्यात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. ज्यामध्ये निष्काळजीपणा आणि कराराच्या उल्लंघनाच्या आरोपांचा समावेश आहे.