-
काहीही हं! मोदी साडी विरुद्ध राहुल साडी, प्रियंका साडी आकर्षणाचा विषय; लोकसभा निवडणूक 2019 प्रचारास हटके सुरुवात
सुरुवातीला सूरतच्या कपडा मार्केटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या प्रतिमेचा साडीवर खुबीने वापर केला जायचा. भाजप कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये मोदी साडीची (Modi saree) भलतीच चर्चा असायची. मात्र, आता यात आणखी दोन चेहऱ्यांची भर पडली असून, राहुल साडी (Rahul Sadi) आणि प्रियंका साडी (Priyanka Sadi) मोदी साडीला टक्कर देताना दिसत आहेत.
-
अखेर भाजप-शिवसेना युती झालीच, जनभावनेचा आदर राखत आगामी निवडणुक एकत्र लढवण्याचा निर्णय
आज सोमवारी (18 जानेवारी) रोजी वरळीतील ब्लू सी येथे संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये अखेर भाजप-सेना युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. तर येणाऱ्या आगामी लोकसभा-विधासभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुक लढवणार असल्याचा महत्वपूर्ण निर्यण घेण्यात आला आहे.
-
शिवसेना, भाजप युतीचं जमलं बरं का; उद्धव ठाकरे, अमित शाह उद्या अधिकृत घोषणा करण्याची शक्यता
लोकसभेसाठी दोन्ही पक्ष फिप्टी फिप्टी म्हणजेच प्रत्येकी 24-24 जागा लढणार असल्याचे समजते. तर, विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना 143 तर, भाजप 145 जागा लढेल. तसेच, भाजपने लोकसभेची पालघरची जागाही शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी दर्शवली असून, शिवसेनेच्या अनेक महत्त्वाच्या मागण्याही भाजपने मान्य केल्याची सूत्रांची माहिती आहे.
-
लोकसभा निवडणूक 2019: प्रकाश आंबेडकर यांच्याकडून बहुजन वंचित आघाडीचे 4 उमेदवार घोषीत, बी जी कोळसे-पाटील निवडणुकीच्या मैदानात
काँग्रेससोबत बोलणी करण्याची वेळ आता निघून गेल्याचे आंबेडकर यांनी मागेच सांगितले आहे. त्यामुळे आंबेडकरांनी आता लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम (AIMIM) या पक्षाचाही समावेश असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
-
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ: नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून पहिली उमेदवारी जाहीर
घराणेशाहीवर टीका करणाऱ्या राणे यांनी स्वत: स्थापन केलेल्या पक्षाची पहिलीच उमेदवारी त्यांनी घरात दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. नारायण राणे यांनी या वेळी शिवसेना आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. देशावर इतका मोठा हल्ला झाला असताना शिवसेना भाजप नेत्यांना युतीची चिंता आहे. या लोकांना केवळ सत्तेची पडली आहे. यांना केवळ सत्ता हवी आहे. जनतेच्या प्रश्नाशी यांना काहीही घेणे नाही, असे सांगत राणे यांनी टीका केली.
-
शरद पवार यांच्या विरोधात कमळ चिन्हावर माढा येथून लोकसभा मैदान मारण्याची महादेव जानकर यांची इच्छा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार हे स्पष्ट होताच जानकर यांनी आपली इच्छा बोलून दाखवली आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्याला तिकिट दिले तर, आपण शरद पवार यांच्या विरोधात माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढू असे जानकर यांनी म्हटले आहे.
-
व्हिडिओ: राहुल गांधी यांचे एका महिलेने घेतले चुंबन, व्हॅलेंटाईन डेला भव्य व्यासपीठावर घडला प्रकार
अचानक घडेला प्रकार पाहून काही काळ उपस्थितही गोंधळून गेले. मात्र, या घटनेमुळे राहुल गांधी जराही विचलीत होताना दिसले नाही. उलट त्यांनी शांतपणे या महिलेने दिलेल्या पुष्पहाराचा स्वीकार केला आणि मंद स्मीत केले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे
-
नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान व्हावेत ही 'मुलायम सिंग यादव' यांची इच्छा, लोकसभेत खुलेआम दिल्या शुभेच्छा
आज संसदेच्या शेवटच्या दिवशी मुलायम सिंग यांना सभागृहात बोलण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी पुन्हा निवडून येतील अणि माझी अशी इच्छा आहे की त्यांनी पुन्हा पंतप्रधानपद सांभाळावं. तसेच सध्या जे खासदार आहेत ते पुन्हा निवडून आले यावेत. असं वक्तव्य केलं आहे.
-
राज ठाकरे यांनी अजित पवार यांचे निमंत्रण स्वीकारल्यास महाराष्ट्रात राजकीय समीकरणं बदलणार
आजवर राष्ट्रवादी आणि मनसे यांचे नाते पाहिल्यास दोन्हीकडी पक्षनेत्यांनी एकमेकांवर येथेच्छ चिखलफेक केली आहे. अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्यावर अनेकदा जोरदार टीकास्त्र सोडले आहे. तर, राज ठाकरे यांनी त्याला अत्यंत तीव्र शब्दांत आणि उपहासात्मक भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. या दोन नेत्यांमधला कलगीतुरा महाराष्ट्राने पाहिला आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर वेगळी खेळी झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाला अनपेक्षितरित्या वेगळे वळण मिळू शकते.
-
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांची ट्विटरवर एण्ट्री, पाहा कोणाला करतात फॉलो
ट्विटरवर नुकत्याच आलेल्या प्रियंका गांधी यांनी अद्याप एकही ट्विट केले नहाी. परंतू, त्यांच्या फॉलोअर्सची संख्या मात्र मिनिटामिनिटाला वाढतच आहे. ट्विटरवर एण्ट्री घेताच त्यांनी सर्वप्रथम आपले बंधू राहुल गांधी यांना फॉलो केले. त्यानंतर त्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया, रणदीप सिंह सुरजेवाला, अहमद पटेल, काँग्रेस, अशोक गेहलोथ आणि सचिन पायलट यांनाही फॉलो केले.
-
लोकसभा निवडणुकीनंतर राम मंदिर बांधकामास सुरुवात: मोहन भागवत
राम मंदिर उभारणीचे निवडणुकीपूर्वी अश्वासन देत सत्तेत आलेल्या भाजपकडून आपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, बहुमताचे सरकार येऊनही भाजपला राम मंदिर उभारण्यात अद्यापतरी यश आले नाही. त्यामुळे आगामी काळात राम मंदिराचा मुद्दा कसा आकार घेतो याबाबत उत्सुकता आहे.
-
मोदी समर्थकांची बदलती 'सूरत'; कपडा व्यापाऱ्यांच्या बिलावरही प्रचारासाठी 'नमो नमो'
सूरतचे कपडे संपूर्ण उत्तर भारत आणि बंगालसह दक्षिण भारतातही लोकप्रिय आहेत. त्यामुळे हे व्यापारी आपल्या आवडत्या नेत्यांचा फोटो इनवाईसवर छापून त्यांना प्रसिद्धी देताना दिसत आहे. अर्थात, त्यांची ही कल्पना ग्राहकांना किती आवडेल हे माहिती नाही, पण, सोशल मीडियावर तरी या इनवाइसचे फोटो व्हायरल होऊ लागले आहेत.
-
विरेंद्र सेहवाग राजकारणाच्या मैदानात? हरियाणा राज्यातून भाजपसाठी करणार बॅटींग?
हरियाणामध्ये हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र सिंह हुड्डा यांचा मुलगा आणि खासदार दीपेंद्र हुड्डा (Deepender Singh Hooda) यांच्या विस्तारीत राजकारणाला आळा खालण्यासाठी विरेंद्र सेहवागला मैदानात उतरवण्याचा भाजपचा विचार आहे.
-
लक्ष्मणराव ढोबळे यांचा राष्ट्रवादी पक्षाला रामराम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश
सोलापूरमध्ये (Solapur) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे (Laxaman Rao Dhoble) यांनी भाजपामध्ये (BJP) प्रवेश केला आहे. जालनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या उपस्थितीत ढोबळे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
-
खल्लास..! ईशा कोप्पीकर देणार कमळाला साथ, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
मॉडेलिंगच्या क्षेत्रातून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या ईशाने अल्पवधीतच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिला बॉलिवूडमधील 'खल्लास गर्ल' म्हणून ओळखले जाते. ईशा कोप्पीकर हिने 1998 मध्ये 'काढ़ल कविताई' तमिळ चित्रपटातून अभिनयात पाऊल ठेवले. सन 2000 मध्ये ईशाने 'फिजा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले
-
बहीण प्रियंका गांधी यांना बंधू राहुल गांधी देणार गिफ्ट; लोकसभा निवडणुकीत घडणार चमत्कार?
राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी योग्य वेळी मोठी खेळी करत राजकारणाच्या पटावर डाव टाकला. त्यामुळे काँग्रेस आणि नेहरु-गांधी घराण्याचे विरोधक, टीकाकार यांना धक्का बसल्याची चर्चा आहे. दरम्यान, विरोधक या धक्क्यातून अद्याप सावरले नसताना राहुल गांधी बहीण प्रियंका गांधी यांच्यासाठी आणखी एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.