Modi Cabinet 2019 | (Photo credit: archived, edited, symbolic images)

Modi Cabinet 2019: लोकसभा निवडणूक 2019 ( Lok Sabha Elections 2019) मध्ये मिळालेले जनमत आणि वाढलेली खासदारांची संख्या विचारात घेता एनडीएतील घटक आणि भाजपचा मित्रपक्ष शिवसेना (Shiv Sena) सध्या काहीसा आक्रमक आहे. शिवसेनेची केंद्रातील बार्गेनिंग पॉवर वाढली असून, केंद्रातील सत्तेत शिवसेना अधिकाधिक वाटा मिळवू पाहात आहे. यासाठी NDA आणि भाजप यांच्यावरील दबाव शिवसेना वाढविण्याची शक्यता आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चेनुसार केंद्रात शिवसेनेला काही मंत्रीपदं आणि दोन राज्यपाल पदं मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमिवर शिवसेनेच्या कोणत्या नेत्यांना मंत्रीपद आणि राज्यपाल पद मिळणार याबाबत उत्सुकता आहे. जाणून एनडीएतील कोणत्या घटक पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार.

2014 च्या तुलनेत या वेळी एनडीएतील घटक पक्षांची संख्या तशी कमी आहे. त्यामुळे इतर घटक पक्षांना अधिक संधी मिळू शकते. या वेळी मोदी मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या सुमारे 40 ते 45 इतकी असू शकते.शिवाय मोदी मंत्रिमंडळात दोन ते तीन महिला चेहऱ्यांनाही संधी मिळू शकते. संकेत आणि नियमांनुसार सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या 15% खासदार हे मंत्री बणू शकतात. म्हणजेच एकूण 81 खासदारांना मंत्री बनता येते. दरम्यान, हा नियम गरज आणि परिस्थितीनुरुप बदलतो. एनडीएने लोकसभेत 353 जागा जिंकल्या आहेत. त्यपैकी 303 जागा भाजपच्या आहेत. (हेही वाचा, Modi Cabinet 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य चर्चीत चेहरे, पाहा कोणाला मिळणार संधी?)

पाहा कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं मिळू शकतात

पार्टी संभावित मंत्री

भाजपा              45+

शिवसेना          03-04

जदयू                03-04

लोजपा              01

आरएलपी         01

आजसू               01

अपना दल         01

अकाली दल       01

दरम्यान, नरेंद्र मोदी हे उद्या (30 मे 2019) पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. त्यामुळे Modi Cabinet 2019 मध्ये कोणत्या पक्षाच्या किती मंत्र्यांना शपथ दिली जाणार हे समजणार आहे. त्यामुळे एनडीएतील घटक पक्षांची सत्तेतील भागिदारी किती हे येत्या काही तासांमध्येच कळणार आहे.