शरद पवार (Photo credit : Youtube)

लोकसभा निवडणुकीत जोरदार प्रचार करूनही राष्ट्रवादी काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागला होता. यामागील कारणांचा आढावा घेण्यासाठी आज मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षाची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे. येत्या काहीच वेळात सुरु हॊणाऱ्या या बैठकीसाठी सकाळी दहा वाजलीतापासून शरद पवार समवेत अन्य वरिष्ठ नेते बैठकीच्या ठिकाणी दाखल होतानाचे दृश्य समोर येत आहेत.या बैठकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संपूर्ण कोअर कमिटी देखील काहीच वेळात दाखल होणार असल्याचे समजतेय.

 ANI ट्विट 

ही बैठक पूर्ण झाल्यावर लगेचच दुपारी 2 वाजता पक्षाची जनरल बैठक सुद्धा होणार आहे. या बैठकीला पक्षातील आमदार, खासदार आणि निवडणूकीमधील उमेदवार आणि कार्यकारिणीतील लोक उपस्थित राहणार आहेत. तसेच बैठकीच्या वेळी आगामी विधानसभा 2019 साठी रणनिती ठरवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे शरद पवार यांच्या भेटीला, विधानसभेच्या कामांसाठी हालचाली सुरु

याबद्दल नवाब मलिक यांनी अधिक माहिती दिली आहे.आज एकीकडे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत सोनिया गांधी यांना पाकसाहतर्फे संसदीय नेतेपद बहाल करण्यात आले आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या बैठकीत कोणते महत्वपूर्ण निर्णय घेतले जाणार याविषयी कुतूहल पाहायला मिळत आहे.काँग्रेस पक्षाच्या संसदीय नेतेपदी सोनिया गांधी यांची नियुक्ती

नुकत्याच महाराष्ट्रात पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाला पाच जागांवर विजय मिळवता आला. तर काँग्रेसला फक्त एकाच जागा मिळाली आहे.  नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याच्या आधी राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थनी जाऊन भेट घेतली असल्याचे काही फोटो पाहायला मिळत होते यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस हे काँग्रेस पक्षातच विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती मात्र यानंतर लगेचच शरद पवार यांनी या चर्चांना फेटाळून कोणतेही विलीनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट केले होते.