काँग्रेस (Congress) पक्षाच्या संसदीय नेतेपदी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संसदीय बैठकीत घेण्यात आलेल्या या निर्णयाबद्दल काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाल (Randeep Surjewala) यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. तर ट्वीटच्या माध्यमातून काँग्रेस पक्षावर दाखवेल्या विश्वासामुळे 12.13 करोड जनतेने विजय मिळवून दिल्याने त्यांचे आभार मानले आहेत.
काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहन सिंह यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला आहे.25 मे रोजी पार पडलेल्या बैठकीनंतर ही प्रथमच सीपीपीची अधिकारिक बैठक आहे.(अबब! देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि खासदारांना मिळतो इतका पगार; मिळणाऱ्या सुविधा पाहून डोळे होतील पांढरे)
#Visuals Sonia Gandhi has been elected as Chairperson of Congress Parliamentary Party (CPP). pic.twitter.com/hDapq8FkJ3
— ANI (@ANI) June 1, 2019
या बैठकीचे अध्यक्षपद सोनिया गांधी सांभाळत असून लोकसभेतील 52 खासदारांनी यावेळी उपस्थिती लावली. त्याचसोबत राज्यसभेतील सदस्यसुद्धा यावेळी उपस्थित होते. तर सीपीपीची बैठक संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडत असून आगामी सत्राची रणनीती ठरण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.