लोकसभेच्या उपाध्यक्षपदी भावना गवळी यांची वर्णी लागणार? शिवसेना पक्षाची भाजपकडे मागणी
भावना गवळी (Photo Credits-Facebook)

देशात नुकत्याच लोकसभा निवडणूका (Lok Sabha Elections) पार पडल्या आहेत. त्यानंतर आता लोकसभा उपाध्यक्षपद कोणाला देण्यात येणार यासाठी चढाओढ सुरु झाली आहे. तर शिवसेनेच्या भावना गवळी (Bhavana Gawali) यांचे नाव उपाध्यपदी सुचवण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भावना गवळी यांचा लोकसभेच्या निवडणूकीत पाच वेळा दणदणीत विजय झाला. मात्र तरीही गवळी यांना मंत्रीपद देण्यापूर्वी त्यांच्या नावाचा विचार करण्यात आला नाही. या कारणामुळे गवळी यांची नाराजी दिसून आली. मात्र आता त्यांना लोकसभेचे उपाध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी शिवसनेने भाजपकडे केली आहे. त्याचसोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून यासाठी  प्रयत्न केले जात आहेत.

(विधानसभेसाठी भाजप आणि शिवसेना यांची नवी खेळी; जागावाटपाबद्दल घेतला मोठा निर्णय)

तत्पूर्वी भावना गवळी यांना शिवसेनेत गटनेते पदी नियुक्ती करण्यात येणार असल्याचा विचार केला होता. परंतु गटनेते पद गवळी यांनी स्विकारण्यास नकार दिला. त्यामुळे शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींसमोर गवळी यांना कोणते पद द्यावे जेणेकरुन त्यांची नाराजी दूर होईल असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळेच सेनेकडून लोकसभेचे उपाध्यक्षपद त्यांच्या पक्षातील उमेदवाराला मिळावे यासाठी मागणी करण्यात आली आहे.