Udayanraje Bhosale | (Photo credit : Facebook)

राज्यात आज सर्वत्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकाल येत असतानाच साताऱ्यातही लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणीही सुरु आहे. उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपात प्रवेश केला. त्यामुळेच आज साताऱ्यातही लोकसभेच्या जागेची मतमोजणी सुरु आहे.

पण धक्कादायक बाब म्हणजे साताऱ्यातून उदयनराजे पिछाडीवर पडले आहेत. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार आपल्या पिछाडीबद्दल ऐकून उदयनराजे भावुक झालेले पाहायला मिळाले.

“लोकशाहीत समाज हाच राजा असतो. त्यांनाच केंद्रबिंदू मानून मी आजवर वाटचाल केली आहे. ते म्हणतील तिच पूर्व दिशा असेल”, असं उदयनराजे म्हणाले.

“मला चांगलं काय करायचं तेच करणार… मी चुकीचा निर्णय घेतला तर… मी जिंकून नाय येत तर पराभव होणार…मी २०-३०-२५ वर्षे घालवली, निस्वार्थपणे लोकांची सेवा केली. इथून पुढे गप्प बसणार”, असंही ते म्हणाले.

इतकाच नव्हे तर ते म्हणाले की, “एक पाऊल मागे जाणं हे मोठी झेप घेण्यासाठी असतं. लोकांनी विचार करुन मतदान केलंय. प्रचारात मी काय केलं हे स्पष्टपणे सांगितले आहे. मी जर निवडून आलो नाही, तर पुढील पाच वर्षे विकास थांबेल.”

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019 Live Updates

सध्याची आकडेवारी बघता उदयनराजे हे जवळपास 94 हजार मतांनी पिछाडीवर आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीनिवास पाटील यांची विजयाकडे मुसंडी मारताना दिसत आहेत.