महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्यात राजकीय दृष्टीने मागील पाच वर्षात स्थैर्य स्थापन करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर जनतेने विश्वास टाकून पुन्हा निवडून दिले आहे. यासाठी पंतप्रधान नरेंडनर मोदी यांनी फडणवीस यांची कौतुक करून नागरिकांचे आभार मानले आहेत. आज निवडणूक निकालाच्या नंतर दिल्ली येथील भाजपा कार्यालयातून ते बोलत होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2019 Live Updates: महाराष्ट्रात राजकीय स्थैर्य स्थापन केल्याने देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा विजय; नरेंद्र मोदी यांनी दिली कौतुकाची थाप


आदित्य ठाकरे यांनी आज विजयानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी आदित्य ठाकरे यांनी मताधिक्य स्वीकारलं आहे.

चांदिवली मतदार संघातून नसीम खान यांचा 409 मतांनी पराभव झाला आहे. दिलीप लांडे यांनी त्यांचा पराभव केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत यांचे आभार मानले आहेत.
भाजपा-शिवसेना गठबंधन में विश्वास प्रकट करने के लिए महाराष्ट्र की जनता का कोटि-कोटि अभिनंदन।
मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र सरकार निरंतर प्रदेश की प्रगति और जनता की सेवा के लिए समर्पित रहेगी।
मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis, श्री @ChDadaPatil व सभी कार्यकर्ताओं को बधाई।— Amit Shah (@AmitShah) October 24, 2019

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले आहेत. तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत यांचे आभार मानले आहेत.
भाजपा-शिवसेना गठबंधन में विश्वास प्रकट करने के लिए महाराष्ट्र की जनता का कोटि-कोटि अभिनंदन।
मोदी जी के नेतृत्व में महाराष्ट्र सरकार निरंतर प्रदेश की प्रगति और जनता की सेवा के लिए समर्पित रहेगी।
मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis, श्री @ChDadaPatil व सभी कार्यकर्ताओं को बधाई।— Amit Shah (@AmitShah) October 24, 2019

भाजपाचा बालेकिल्ला समजला जाणार्या घाटकोपर पूर्व आणि पश्चिम मतदारसंघात भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. पराग शहा आणि राम कदम विजयी ठरले आहेत. इथे वाचा निकालाचे अपडेट्स .

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपा- शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळे बंडखोरी देखील झाली. मुख्यमंत्र्यांनी या बंडखोरीमुळे नुकसान झाल्याची कबुली दिली आहे. तसेच जे जिंकून आले आहेत त्यांची मनधरणी करून महायुतीमध्ये सहभागी करून घेतलं जाईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

भाजपा कार्यालयात देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या वेळेस त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी बोलताना आज सत्ता स्थापनेची घाई नसल्याचं म्हटलं आहे. फॉर्म्युल्यावर निर्णय घेतल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा केला जाईल असं म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी जनतेने दिलेला निकाल स्वीकारणार आसल्याचं म्हटलं आहे. आता सत्ता स्थापानेसाठी भाजपासोबत बोलणी करणार, 50-50 चा फॉर्म्युला पुन्हा भाजपाच्या लक्षात आणून देणार.

भाजपा नेते चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, भाजपा कार्यालयात पोहचले आहेत. तर मातोश्रीवर उद्धव ठाकरे मीडियाशी बोलत आहेत.

राजू पाटील कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विजयी; मनसेचे खाते उघडले. शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा केला पराभव.

राजू पाटील कल्याण ग्रामीण मतदारसंघातून विजयी; मनसेचे खाते उघडले. शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांचा केला पराभव.

ठाकरे कुटुंबातून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेल्या आदित्य ठाकरे यांचा विजय झाला आहे. वरळीत सुरेश माने वर मात करून आदित्य ठाकरेंनी विजय मिळवला आहे. 67 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे.

भाजपा 4 वाजता पत्रकार परिषद घेणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. विधानसभा निवडणूक निकालाबद्दल भाजपाची प्रतिक्रिया यावेळेस स्पष्ट होणार आहे.

एकनाथ खडसे यांना नाकारून त्यांची लेक रोहिणी खडसे यांना भाजपाने तिकीट दिले. मात्र मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाल्या आहेत. तर इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील पराभूत झाले आहेत.

शाहूवाडीमध्ये जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे विजयी; शिवसेना उमेदवार सत्यजित पाटील यांना पराभूत केले आहे.

सोलापूर मध्य मध्ये कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी ठरल्या आहेत. प्रणिती या माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आहेत. सुरूवातीला त्या पिछाडीवर असल्याच्या बातम्या आल्या होत्या. अटीतटीच्या लढाईत अखेर प्रणिती पुन्हा आमदार झाल्या आहेत.

कोकणात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर विजयी ठरले आहेत. राजन तेली यांचा पराभव केला आहे. इथे पहा सारे निकालाचे सारे अपडेट्स .

कोकणात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात दीपक केसरकर विजयी ठरले आहेत. राजन तेली यांचा पराभव केला आहे. इथे पहा सारे निकालाचे सारे अपडेट्स .

निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना, भाजप प्रवेश मिळवणाऱ्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणाऱ्या तब्बल 19 आयारामांचा पराभव झाला आहे.

वांद्रे विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे झिशान सिद्दीकी यांचा विजयी झाले. शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी या मतदारसंघातून बंडखोरी केली होती. तृप्ती सावंत यांना 23 हजार मतं मिळाली. याचा परिणाम शिवसेनेचा उमेजदवार (महाडेश्वर) पराभूत होण्यात झाला. त्यामुळे शिवसैनिकांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे सावंत यांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढविण्यात आले आहेत.

गंगाखेड येथील शिवसेना उमेदवार रत्नाकर गुट्टे हे 1800 मतांनी विजयी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे गुट्टे हे सध्या तुरुंगात आहेत. त्यांनी तुरुंगातूनच ही निवडणूक लढवली होती.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केलेल्या दिलीप सोपल यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. दिलीप सोपल हे शरद पवार यांच्या जवळचे मानले जात

डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे रविंद्र चव्हाण विजय झाले आहेत. या विजयाने चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रीक साधली आहे. त्यांच्या विरोधात मनसेचे मंदार हळबे रिंगणात होते.

बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांचा विजय झाला आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात शिवसेनेचे प्रदीप शर्मा हे रिंगणात होते.

धुळे मतदारसंघातून एमआयएएम पक्षाचा उमेदवार 2500 हजार मतांनी विजयी. गेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे दोन आमदार विधानसभेत होते. आता एमआयएम किती जागांवर विजय मिळवणार याबाबत उत्सुकता आहे.

मुरबाड: किसन कथोरे 1 लाख 72 हजार मतांनी विजयी

संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात विजयी झाले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी 6200 मतांची आघाडी घेतली.

वांद्रे पूर्व या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात कॉंग्रेस विजयी; झिशान सिद्दिकी विजयी झाले आहेत.

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक निकाल हाती येण्यास सुरूवात झाली आहे. ग्रामीण आणि शहरी भागामध्ये 'नोटा' ला 10,000 मतं मिळाली आहे. पलूस-कडगाव, लातूर आणि बोरिवली विधानसभा मतदार संघात हा प्रकार घडला आहे. बोरिवलीमध्ये भाजपाचे सुनील राणे जिंकले आहेत. इथे पहा निवडणूक निकाल अपडेट्स

भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आणि शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांचा पुन्हा विजय झाला आहे. तर वांद्रे पूर्व मध्ये कॉंग्रेस आघाडीवर आहे. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे कुटुंबाचे निवासस्थान असलेल्या मातोश्री या वांद्रे पूर्व भागात कॉंग्रेसची आघाडी पाहून उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे.

मुंडे कुटुंबीयांमधील वाद महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीदरम्यान चव्हाट्यावर आला आहे. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वैयक्तिक आरोप केल्याने पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली होती. मात्र आता धनंजय मुंडे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. इथे पहा निकालाचे अपडेट्स

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. शिर्डीमधून भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील विजयी ठरले आहेत. कॉंग्रेसमधून भाजपामध्ये पक्ष प्रवेश केलेल्या राधाकृष्ण यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. सोबतच बेलापूर मध्ये मंदा म्हात्रे विजयी ठरल्या आहेत. इथे पहा निकालाचे अपडेट्स

अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून विजयी; भाजपाच्या गोपिचंद पडाळकर यांचा पराभव झाला आहे.

अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून विजयी; भाजपाच्या गोपिचंद पडाळकर यांचा पराभव झाला आहे.

पुण्यामध्ये कसबा पेठ विधानसभा मतदार संघात भाजपाच्या मुक्ता टिळक विजयी ठरल्या आहेत. तर संगमनेर मध्ये बाळासाहेब थोरात विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. इथे पहा निवडणूक निकाल अपडेट्स .

शिवसेनेचे श्रीनिवास वानगा विजयी ठरले आहेत. शिवडी मधून अजय चौधरी, कुर्ला मधून मंगेश कुडाळकर विजयी ठरले आहेत. इथे पहा निकालाचे सारे अपडेट्स .

कोकणामध्ये कणकवलीमध्ये नितेश राणे विजयी ठरले आहेत. त्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शेखर निकम चिपळून मधून विजयी ठरले आहेत. राष्ट्रवादीचे घड्याळ सोडणा-यांची वेळ चुकली; शरद पवारांची एकाकी झुंज यशस्वी ठरली.

महाराष्ट्र विधानसभेचे निकाल हाती येण्यास सुरूवात झाली आहे. सिंदखेडामध्ये जयकुमार रावल विजयी ठरले आहेत. येथे मनसेच उमेदवार नरेंद्र पाटील यांनी तगडी टक्कर दिली.

कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे नितेश राणे विजयी ठरले आहेत. कोकणातील बिग फाईटपैकी एक आहे. युती मोडत येथे शिवसेनेने आपला उमेदवार उभा केला होता. मात्र मतदारांनी नितेश राणेंच्या बाजूने कौल दिला आहे. इथे पहा निकालाचे अपडेट्स .

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 च्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. पहिला निकाल जाहीर झाला आहे. शहादा विधानसभा मतदार संघात राजेश पडवी विजयी झाले आहेत. भाजपा 101 तर शिवसेना 64 जागांवर आघाडीवर आहेत.

धनंजय मुंडे यांच्या समर्थकांचा जल्लोष सुरू झाला आहे. 18,000 च्या मताधिक्याचा आनंद व्यक्त करण्यात आला आहे. भाजपाच्या पंकजा मुंडे यांच्यावर त्यांनी मात केली आहे.

सातारामध्ये लोकसभा पोट निवडणूकीमध्ये उदयनराजे पराभवाच्या छायेत आहेत. पण विधानसभेमध्ये शिवेंद्र राजे विजयाकडे कूच करत आहेत. सातारा मध्ये भाजपाचे शिवेंद्र राजे आघाडीवर आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे यंदा निवडणूकीच्या रिंगणात असलेले अजित पवार, रोहित पवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. दोघेही आघाडीवर आहेत. अजित पवार बारामतीमधून तर रोहित पवार कर्जत - जामखेड येथून निवडणूक लढत आहे. इथे पहा लाईव्ह अपडेट्स.

महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांवरील कल हाती आले आहेत. जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे.
शिवसेना - 74
भाजपा -110
राष्ट्रवादी - 49
अपक्ष - 18
कॉंग्रेस - 37

अहमदनगर मध्ये शरद पवारांचे नातू रोहित पवार पहिल्यांदा विधानसभा निवडणूकीमध्ये उतरले होते. यामध्ये ते आघाडीवर असून ते मतामोजणी कक्षावर पोहचले आहेत.

परळीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे धनंजय मुंडे आणि भाजपाचे पंकजा मुंडे यांच्यामध्ये कांटे की टक्कर सुरू आहे. यामध्ये धनंजय मुंडे आता सहाव्या फेरीनंतर आघाडीवर आहेत.

शिवसेनेचे आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून 11,000 मतांनी आघाडीवर आहेत. इथे पहा लाईव्ह अपडेट्स.

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक निकालाची मतामोजणीला सुरूवात झाली आहे. राधाकृष्ण विखे पाटील नंतर विजय वडेट्टीवार विधानसभेत विरोधी पक्ष नेते होते. राज्यात महायुती आघाडीवर असली तरीही चंद्रपूरमध्ये शिवसेना-भाजपाला चमकदार कामगिरी करता आलेली नाही.

नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिछाडीवर आहेत.

कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे 4400 मतांनी पिछाडीवर आहेत. तर पुण्यात 5 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. इथे पहा निकालाचे लाईव्ह अपडेट्स

चंद्रकांत पाटील कोथरूडमधून आघाडीवर तर जळगावमध्ये अपक्ष अनिल गोटे देखील आघाडीवर आहेत. आज सकाळी चंद्रकांत पाटील यांनी दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतले आहेत.

धनंजय मुंडे 1500 मतांनी आघाडीवर आहेत. पंकजा मुंडे पिछाडीवर आहे.चुलत भावंडांमध्ये होणार्या लढतीमध्ये प्रचारादरम्यान शेवटच्या टप्प्यांत वैयक्तित टिपण्णी करण्यात आली आहे.

बारामतीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार आघाडीवर आहेत. भाजपाचे पडळकर यांचे त्यांना आव्हान आहे. पडळकरांना पहिल्या फेरीत 1000 मतांचा टप्पा देखील पार करता आला नाही. इथे पहा निकालाचे लाईव्ह अपडेट्स .

पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरचे ऋतूराज पाटील आघाडीवर आहेत. तर समीर भुजबळ यांच्या विरूद्ध सुहास कांदे आघाडीवर आहेत. नगरमधून संग्राम जगताप आघाडीवर आहेत.

मुंबईमध्ये आदित्य ठाकरे 7 हजार मतांची आघाडी आहे. अभिजीत बिचुकले यांना पहिल्या फेरीत शून्य मतं पडली आहेत. महायुतीची आघाडी कलांमध्ये अर्धशतक पूर्ण केले आहे. इथे पहा निकालाचे लाईव्ह अपडेट्स.

महराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 चे निकाल हाती येण्यास सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये कसबा मधून मुक्ता टिळक, मुक्ताईनगर मधून रोहिणी खडसे, रोहित पवार, शिर्डी मधून राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर आहेत. आदित्य ठाकरे 6 हजार मतांनी आघाडीवर आहेत. इथे पहा निकालाचे लाईव्ह अपडेट्स .

भाजपाचे अतुल भातखळकर 4000 मतांनी आघाडीवर अअहेत. आदित्य ठाकरेदेखील आघाडीवर आहेत. मुंबईमध्ये महाआघाडीला अद्याप कलांमध्येही आघाडीवर आहेत. तर कोकणातील बिग फाईटमध्ये नितेश राणे 700 मतांनी आघाडीवर आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 ची मतमोजणी सुरू झाली आहे. या मतमोजणीमध्ये देवेंद्र फडणवीस, अशोक चव्हाण आघाडीवर आहेत. मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे देखील आघाडीवर आहेत. थोड्याच वेळात 288 जागांवरील निकाल स्पष्ट होणार आहेत. इथे पहा निकालाचे लाईव्ह अपडेट्स.

सदा सरवणकर, आदित्य ठाकरे, मंगलप्रभात लोढा आघाडीवर आहेत. तर नागपूर मध्येही भाजपाचे देवेंद्र फडणवीस देखील आघाडीवर आहेत. कुलाबा, वरळीमध्ये पोस्टल मत मोजणीला सुरूवात झाली आहे.

सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. पहिला कल हाती येण्यास आता अवघ्या काही वेळाचा अवधी आहे. मुंबईमध्ये कुलाब्यात पोस्टल मतमोजणीला सुरूवात झाली आहे. नक्की वाचा: कर्जत-जामखेड, कोथरूड, कणकवली, परळी, सातारा लोकसभा निवडणूक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष; काही शे, हजारांत सामना सुटण्याची शक्यता.

मुंबई सह राज्यामध्ये सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार; थोड्याच वेळात कल येणार हाती. निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागले असून सुरूवातीला कल आणि थोड्याच वेळात कौल हाती येण्यास सुरूवात होणार आहे.

विधानसभा निवडणूक निकाल 2019 च्या पूर्वी कणकवलीमध्ये पाऊस पडत आहे. काही काळ कोसळलेल्या दमदार पावसामुळे मतदान केंद्राबाहेर पाणीच पाणी झाले आहे.

मुंबई भाजपा कार्यालयाबाहेर विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी. आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे.
Mumbai: BJP state office decorated ahead of counting of votes for #MaharashtraAssemblyPolls pic.twitter.com/WbVuWwy92j
— ANI (@ANI) October 24, 2019
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2019 Live News Update: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Assembly Elections 2019) साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आणि अंतिम निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी आठ वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात होईल. राज्यातील तब्बल 288 विधानसभा मतदारसंघ आणि साताार लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले. मतदान पार पडताच मतमोजणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. मतमोजणीसाठी तब्बल 10 हजार पेक्षाही अधिक आधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याची माहिती माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली आहे. शिंदे यांनी सांगितले की, मतमोजणीसाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आले आहे. या मतमोजणीचे लाइव्ह अपडेट घेण्यासाठी सज्ज राहा लेटेस्टली मराठीसाठी. सातारा: विधानसभा, लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होणार तब्बल 12 तास उशीराने; कारण घ्या जाणून.
अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व मतदारसंघातील मतमोजणी एकूण 269 ठिकाणी पार पडेल. त्यासाठी मतदारसंघातील मतदान केंद्रांच्या सख्याप्रमाणानुसार 14 ते 20 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलसाठी प्रत्येकी एक पर्यवेक्षक(सुपरवायझर) आणि दोन सहाय्यक, तीन मतमोजणी अधिकारी असतील. मतमोजणीची सुरुवात 5 बुथवरील व्हीव्हीपॅट चिठ्ठ्यांपासून होईल. हे बूथ चिठ्ठी टाकून निवडले जातील. स्ट्राँगरुम ते मतदान केंद्र इथपर्यंतचा ईव्हीएमाच्या प्रवासाचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येईल.
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 288 जागांपैकी शिवसेना ही 124 तर भाजप हा 164 जागांवर लढतो आहे. उर्वरीत जागांव युतीचे मित्रपक्ष लढत आहेत. तर, दुसऱ्या बाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी हे पक्ष आघाडी करुन लढत आहेत. काँग्रेस 147 तर, राष्ट्रवादी 124 जागा लढवत आहे. उर्वरीत जागा दोन्ही पक्षांनी समाजवादी पक्ष, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल, शेतकरी कामगार पक्ष अशा मित्रपक्षांना सोडल्या आहेत. मतमोजणीच्या पार्श्वभूमिवर राज्यातील राजकीय वर्तुळ आणि सर्वच नेत्यांसह कार्यकर्ता आणि जनतेमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.
संबंधित बातम्या