मातोश्रीच्या अंगणात काँग्रेसची आघाडी; वांद्रे पूर्व मतदारसंघात झिशान सिद्दीकी 2000 मतांनी पुढे
Maharashtra Assembly Election Result 2019 (File Image)

शिवसेनेचे (Shivsena) विश्वनाथ महाडेश्वर (Vishwanatha Mahadeshwar) यांना काटे की टक्कर देत वांद्रे पूर्व मतदारसंघात (Bandra East Assembly Constituency)  म्हणजेच सेनेच्या होमग्राउंडवर काँग्रेसने आघाडी घेतली आहे. काँग्रेस (Congress)  पक्षाचे झिशान बाबा सिद्दीकी (Zeeshan  Baba Siddique) यांनी सध्या 28, 470 मते मिळवतात दोन हजार मतांची आघाडी घेतली आहे. तर सेनेचे उमेदवार महाडेश्वर हे 26 , 783 मतांनी दुसऱ्या स्थानी आहेत. तर विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी अपक्ष म्ह्णून लढत असताना सुद्धा 20 हजारहून अधिक मते मिळवली आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल : भाजपला अपेक्षेपेक्षा कमी मते मिळताच शिवसेना आक्रमक; मुख्यमंत्री पदाची केली मागणी

महाराष्ट्र विधानसभेत सध्या सत्तेत असलेल्या भाजपाचा मित्रपक्ष शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांपैकी एक वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ आहे. ठाकरे कुटुंबीय या मतदारसंघाचे रहिवासी असल्याने मुंबईतील हा एक हायप्रोफाईल मतदारसंघ म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते.  शिवसेनेच्या तृप्ती सावंत या मतदार संघातील विद्यमान आमदार आहेत. यंदा शिवसेनेने महापौर विश्वनाथ महाडेश्वर विरूद्ध कॉंग्रेसचे झिशान सिद्दकी आणि मनसेचे अखिल चित्रे असा सामना रंगला होता.

दरम्यान, हे मताधिक्य अगदी कमी अधिक स्वरूपात आहे. यामध्ये कोणता पक्ष अखेरीस बाजी मारतो हे येत्या काही तासात समोर येईल.