महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकी (Maharshtra Assembly Elections) च्या मतमोजणीतला आज सकाळपासून सुरुवात झाली असून काही ठिकाणचे निकाल हाती येऊ लागले आहेत. वास्तविक आताही भाजपा (BJP) आघाडीवर असताना सुद्धा अपेक्षेपेक्षा कमी मते मिळत असल्याने युतीतील मित्रपक्ष शिवसेना (Shivsena) आक्रमक झाली आहे. भाजपा हवी तशी आघाडी घेऊ न शकल्याने युतीचा मुख्यमंत्री पद शिवसेनेला देण्यात यावे अशी सुद्धा मागणी होत आहे. या पदासाठी सुरुवातीपासूनच शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackrey) यांचे नाव चर्चेत आहे तर आजच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील आदित्य यांनीच मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा प्रकट केली होती.
प्राप्त माहितीनुसार संजय राऊत हे काही वेळातच शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत निकालानंतर सत्ता प्रस्थापित करताना युतीने 50- 50 हा फॉर्मुला वापरण्यावर या भेटीत चर्चा होणार आहे.
ANI ट्विट
#WATCH Sanjay Raut, Shiv Sena: I am going to meet Uddhav Ji. Number itne bure bhi nahi hain, aisa hota hai kabhi kabhi. Yes, we will definitely continue with the alliance. We have agreed upon a 50-50 formula. #MaharashtraAssemblyPolls2019 pic.twitter.com/ae0bJUNI8q
— ANI (@ANI) October 24, 2019
दरम्यान यंदा मुंबई मधील वरळी मतदारसंघ हा निवडणूक रणधुमाळीत बहुचर्चित ठरला होता.आदित्य ठाकरे यांनी ही जागा जिंकायच्या अनुषंगाने जोरदार प्रचार केला होता. आज सकाळपासून देखील आदित्य यांनी मोठा मताधिक्याने लीड घेतली होती. या जागी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी आदित्य यांच्या विरुद्ध उमेदवारी दाखल केली होती.