दिल्ली: डान्सर सपना चौधरी हिचा दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश
Sapna Chaudhary joins BJP (Photo Credit: ANI)

हरिणायाची सुपरस्टार डान्सर सपना चौधरी (Sapna Choudhary) हिने आज भारतीय जनता पक्षात (Bharatiya Janata Party) प्रवेश केला. भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत तिने भाजपमध्ये (BJP) पर्दापण केले. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडिअममध्ये आयोजित करण्यात आलेल्या भाजपा सदस्यता अभियान कार्यक्रमात (Membership Campaign) सपना चौधरी भाजपची सदस्या बनली. या कार्यक्रमाला शिवराज सिंह चौहान, भाजप महासचिव रामलाल आणि मनोज तिवारी आदी भाजप नेते उपस्थित होते. भाजप पक्षाशी जोडण्यासाठी हे अभियान चालवण्यात येत आहे. सपना चौधरीचे जबरदस्त फॅन फॉलोईंग असून त्याचा फायदा नक्कीच भाजप पक्षाला होईल.

ANI ट्विट:

लोकसभा निवडणूक 2019 पूर्वी सपना चौधरी भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यापूर्वी सपना चौधरी काँग्रेसमध्ये जाणार, अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. मात्र कालांतराने या सर्व अफवा असल्याचे स्पष्ट झाले. मात्र आता पुन्हा एकदा सत्तेत आलेल्या भाजप पक्षात सपना चौधरीने प्रवेश केला आहे. (Video: सपना चौधरी हिच्या गाण्यावर IPS अधिकारी डान्स करु लागताच महिला पोलिसही थिरकले)

6 जुलै म्हणजेच भाजपचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बनारस येथे सदस्यता अभियानाची सुरुवात केली. हे अभियान 10 ऑगस्ट पर्यंत सुरु राहील.