Haryanvi Singer, Dancer Sapna Chaudhary | (Photo Credits: Facebook)

Lok Sabha Elections 2019:  आपल्या दिलखेच अदांनी अनेकांना घायळ करणाऱ्या आणि बिग बॉस सारख्या रिअॅलीटी शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना सपना चौधरी ( Sapna Choudhary) यांनी थेट काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. हरियाणाच्या असलेल्या नृत्यांगना सपना चौधरी ( Sapna Choudhary News) यांना काँग्रेसकडून भाजप (BJP) मथुरा लोकसभा मतदारसंघ (Mathura Seat) उमेदवार हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या विरोधात निवडणूक तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. मथूरा मतदारसंघातून हेमा मालिनी या दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. सपना चौधरी या आपल्या बहारदार नृत्यामुळे युट्युब आणि सोशल मीडियावर जोरदार व्हायरल असतात. उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशअध्यक्ष राज बब्‍बर (Raj Babbar) यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी सपना चौधरी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी कांग्रेस प्रदेश संघटक नरेंद्र राठी उपस्थित होते.

भाजपचे माजी खासदार उदय सिंह यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

दरम्यान, या आगोदर भाजपचे माजी खासदार उदय सिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उदय सिंह यांनी जानेवारी महिन्यातच भाजपमधील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. बिहारमध्ये 40 जागांपैकी नितीश कुमार यांच्या जनता दलाला 17 जागा देऊन आत्मसमर्पण का केले? असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2019: माजी क्रिकेटर गौतम गंभीर याचा 'भाजप'मध्ये प्रवेश)

एएनआय ट्विट

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

दुसऱ्या बाजूला भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या आणि रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गौतम गंभीर (Gautam Gambhir)यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे आपण फारच प्रभावीत झाल्याने आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे गंभीर यांनी म्हटले.